तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेता सुधीर वर्मा याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. अभिनेत्याच्या आत्म’हत्येचे कारण अद्याप समाेर आलेले नाही. मात्र, सुधीरने विशाखापट्टनम येथील राहत्या घरात आज म्हणजेच सोमवारी (दि. 23 जानेवारी)ला आत्म’हत्या केली आहे.
अभिनेता सुधीर वर्मा (sudheer varma) याने ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून 2013 साली सिनेसृष्टीत पदार्पण केले हाेते. 2016 साली प्रदर्शित झालेला कुंडानापू या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका हाेती. अभिनेत्याने आपल्या अभिनय काराकिर्दीत अनेक दमदार चित्रपटात काम केले. मात्र, कुंडानापू या चित्रपटातून अभिनेत्याला विशेष ओळख मिळाली.
Sometimes the sweetest smiles hide the deepest pain..
We never know what others are going through.. Please be empathetic and spread just love !!Miss you ra Sudheer ! You shouldn’t have done this.. May ur soul rest in peace ???? pic.twitter.com/Egs7Sh0u3d
— Venky Kudumula (@VenkyKudumula) January 23, 2023
अभिनेत्याने ‘सेकंड हँड’, ‘नेक्कू नाकू डॅश डॅश’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सुधीरला मनासारखे काम मिळत नव्हते. असे असले तरी सुधीर वर्माच्या आत्म’हत्येचे नेमके कारण अद्याप समाेर आलेले नाही.(telugu actor sudheer varma committed suicide)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री
केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ










