Saturday, June 29, 2024

शाेयबसाेबत लग्न बंधनात अडकण्यापूर्वी सानियाचा माेडला हाेता साखरपुडा, वाचा सविस्तर

भारताची लाेकप्रिय टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या खेळामुळे कायमच चर्चेत असते. मात्र, यावेळी सानिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्न बंधनात दुरावा आला आहे. इतकंच नाही तर त्याचं नातं घटस्फोटापर्यंत पोहचल्याचीही चर्चा आहे. सानियाच्या घटस्फाेटाचं नेमकं कराण काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण मंडळी तुम्हाला माहित आहे का? सानियाचा लग्नाआधीही साखरपुडा माेडला हाेता. काय आहे नेमकं प्रकरण चला जाणून घेऊया…

टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) हे 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये लग्न बंधनात अडकले हाेते. मात्र, याआधी सानियाने 2009मध्ये बालपणीचा मित्र सोहराब मिर्झासोबत ब्रेकअप केलं होतं. त्यावेळी दोघांची एन्गेजमेंट (Sania Mirza Engagement) देखील तुटली होती. एन्गेजमेंट तुटण्यामागचं कारण अद्याप समाेर आलेल नाही, मात्र सोहराब आणि सानियाने मिळून हा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानियाला सुरुवातीच्या काळात टेनिस खेळताना शाॅर्ट ड्रेस घातल्याने तिच्या विराेधात फतवा देखील आला हाेता. सण 2005 मध्ये एका धर्मगुरूने तिच्या विराेधात फतवा जारी करताना सानियाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला हाेता. यावर वक्तव्य करत सानिया म्हणाली हाेती, “मला काय घालायचंय काय नाही, हा माझा सर्वस्वी निर्णय आहे.” आणि त्यानंतर वाद शांत झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

मात्र, यानंतर 2007मध्ये सानिया एका धार्मिक स्थळावर शूटिंग केल्यामुळं धर्मगुरूंच्या निशाण्यावर आली होती. त्यानंतरही 2008मध्ये तिरंग्याकडे पाय ठेवून बसल्यान सानिया चांगलीच वादाच्या घेरात अडकली हाेती. तिचा हा फाेटाे प्रचंड व्हायरल झाला हाेता. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकाही केली हाेती आणि तिनं तिरंग्याचा अपमान केल्याचा आराेपही तिच्यावर करण्यात आला हाेता. (sania mirza first marriage broken shoaib malik wife india pakistan trending news)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘आदिपुरुष’बाबत निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

‘ही’ अभिनेत्री लढतेय कॅन्सरसोबत, सोशल मीडियावर केस फोटो आत्मविश्वासाने केले पोस्ट

हे देखील वाचा