Thursday, March 28, 2024

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘आदिपुरुष’बाबत निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय

बाहुबली’ फेम प्रभास(Prabhas) आणि क्रिती सेनन(Kriti Sanon) स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. व्हीएफएक्स आणि रावणाची भूमिका यावरून लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. हा चित्रपट तब्बल 400 कोटी रुपये खर्च झालं असून बजेटच्या मुद्द्यावरुनही टीका होऊ लागली. कदाचितहाच वाद ओम राऊतला चांगलंच महागात पडला आहे. कारण या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

आपल्या चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना दिग्दर्शक ओम राऊत यांनी लिहिले आहे की, ‘आदिपुरुष’ हा फक्त सिनेमा नाही तर श्रीरामावरील आपल्या भक्तीचे, इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव मिळणार आहे. पण त्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर भारतीयांना नक्कीच अभिमान वाटेल. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही असेच राहुदेत”.

 

View this post on Instagram

 

 

 

या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. यासाठी आणखी 100 कोटी रुपये खर्च होणार आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांचे पात्र प्रभास साकारणार आहे. सीताची भूमिका क्रिती सेनन साकारणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे.

‘आदिपुरुष’ या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट मध्यंतरी वादात अडकला होता आता मात्र या टीकेची दखल घेऊन निर्माते यात सुधारणा करणार असे दिसते आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.(adipurush new release date has been pushed forward)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जुन्या आठवणी ताज्या करत नंदिता दासने शेअर केली पोस्ट, पाहा अभिनेत्रीचा ‘थ्रोबॅक’ फोटो, ओळखणेही झाले कठीण
राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन: बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केली कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात

हे देखील वाचा