Sunday, May 19, 2024

स्पीड भोवला: मनोरंजनविश्वातील ‘या’ सुपरस्टारला भरावा लागला भुर्दंड

दाक्षिणात्य अभिनेता असलेला थलापति विजय सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच तो जवान सिनेमामुळे कमालीचा गाजत आहे. तर सोबतच त्याच्या राजकारणातील प्रवेशाच्या बातम्यांमुळे देखील तो प्रकाशझोतात आला आहे. मात्र या सर्वांमध्ये अजून एक अशी बाब घडली ज्यामुळे तो खूपच गाजत आहे. झाले असे की, थलापति विजयने गाडी चालवताना नियमांचे पालन न केल्यामुळे त्याला दंड भरावा लागला आहे.

झाले असे की, थलापति विजय त्याचा पाठलाग करणाऱ्या फॅन्सपासून वाचण्यासाठी तो पनैयुरपासून ते नीलांगराय येथे त्याच्या निवासस्थानापर्यंत तो प्रवास करत असताना त्याने सिग्नल तोडले. विजय आणि त्याच्या ड्रायव्हरने या चुकवाचूकवीत दोन सिग्नल त्यांनी तोडले आणि पुढे गेले. यामुळे विजयला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ५०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे. विजयची कार आणि दंडाच्या पावतीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दरम्यान थलापति विजय सध्या त्याच्या राजकारणातील प्रवेशामुळे चांगलाच गाजत आहे. विजयने नुकतीच त्याच्या शुटिंगनंतर विजय मक्कल इयक्कम (वीएमआई)च्या कार्यकर्त्यांची भेट घेतली सोबतच त्याच्याशी चर्चा देखील केली. त्यांच्या या भेटीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि विजय राजकारणात जाणार या चर्चांना उधाण आले. असे देखील सांगितले जात आहे की, राजकारणात गेल्यानंतर विजय त्याचे चित्रपटांचे करियर बंद करणार असून, पूर्ण लक्ष राजकारणावर देणार आहे. मात्र यात किती तथ्य आहे याबद्दल शंका आहे.

दरम्यान थलापति विजयच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो सध्या लोकेश कनगराज यांच्या ‘लिओ’ सिनेमात दिसणार आहे. मागील बऱ्याच काळापासून या सिनेमाने बज निर्माण केला आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात संजय दत्त खलनायक साकारणार असून अनेक मोठे कलाकार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अधिक वाचा-
प्रिती झिंटाने केले जुळ्या मुलांचे मुंडण, फाेटाे शेअर करत सांगितले विधीचे महत्त्व
राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

हे देखील वाचा