Tuesday, September 26, 2023

प्रिती झिंटाने केले जुळ्या मुलांचे मुंडण, फाेटाे शेअर करत सांगितले विधीचे महत्त्व

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर आहे. अभिनेत्री परदेशात तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. 2021मध्ये प्रीतीने जुळ्या मुलांना जन्म दिला, त्यानंतर आता तिने तिच्या जुळ्या मुलांचे मुंडण करून घेतले आहे. प्रितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंडन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करण्यासोबतच तिने या प्रथेचे महत्त्वही सांगितले.

प्रिती (preity zinta) हिने तिच्या मुलांचा जय आणि जियाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही जमिनीवर बसलेले दिसत आहेत आणि त्याची पाठ कॅमेऱ्याकडे आहे. फोटो शेअर करण्यासोबतच प्रीतीने हिंदू धर्मात मुंडन सेरेमनीचा अर्थ काय आहे हे देखील सांगितले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या वीकेंडला अखेर मुंडन सोहळा पार पडला. हिंदूंसाठी, प्रथमच केस कापणे हे त्यांच्या भूतकाळातील आठवणी आणि भूतकाळातील स्वातंत्र्य मानले जाते. त्यांच्या मुंडन समारंभानंतर जय आणि जिया येथे आहेत.”

प्रीती झिंटा हिंदी चित्रपटसृष्टीपासून बराच काळ दुर असली तरी भारताची माती आजही तिला आकर्षित करते. अभिनेत्री नुकतीच भारतात आली होती. यादरम्यान ती तिच्या अनेक मैत्रीनींना भेटली, ज्यात नर्गिस फाखरीही होती. प्रीतीने नर्गिससोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आणि स्वादिष्ट पाककृतीची झलकही दाखवली हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

अशात आता प्रीती लॉस एंजेलिसला परतली आहे. घरी परतल्यानंतर तिने जय आणि जियाच्या मुंडण सोहळ्याचा फोटो चाहत्यांनसाेबत शेअर केले.(bollywood actress preity zinta shares after mundan ceremony photo of children jay and gia tells importance of ceremony )

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

हे देखील वाचा