Sunday, April 14, 2024

राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

राखी सावंत तिच्या बोल्ड आणि बिंदास स्टाइलसाठी ओळखली जाते. पब्लिकली काहीही करण्यापूर्वी अभिनेत्री फारसा विचार करत नाही. प्रसारमाध्यमांसमाेर राखी बिनधास्तपणे आणि धाडसाने काहीही बोलून देते. अशात पुन्हा एकादा राखीने असेच काहीसे केले आहे, ज्याने साेशल मीडिया युजर्स पाेटधरून हसत आहेत.

सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता हैराण असतानाच राखी सावंत (rakhi sawant) हिने टोमॅटो पिकवण्याचे तंत्र दाखवले आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राखी बागेत बसून टोमॅटो पिकवताना दिसत आहे. राखी एका भांड्यात टोमॅटो लावताना दिसत आहे. राखी सावंतच्या भांड्यात 4-5 टाेमॅटाे आहे, त्यावर ती माती टाकते आणि नंतर रोपटं लावते.

टोमॅटोची लागवड केल्यानंतर राखीने सांगितले की, ‘टोमॅटो 15 दिवसांत येतील.’ तिच्या शेजारी बसलेल्या माळ्याचे म्हणणे आहे की, ‘अवघ्या 15 दिवसांत टोमॅटो झाडाला लागेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यासोबतच राखीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती म्हणते की, ‘इतके टोमॅटो असतील की ते सात जन्मांसाठी उपयोगी पडतील.’ राखीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरता आले नाही आणि त्यांनी व्हिडिओवर भन्नाट कमेंट केल्या. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘टोमॅटो खूप महाग आहेत आणि राखी त्यांचा नाश करत आहे., तर ‘दुसर्‍या युजरने ‘इतके टोमॅटो वाया घालवू नका, फक्त बिया लावा’ अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वी राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती तिच्या डोक्यावर अंडी फोडताना दिसत होती. यादरम्यान ती ‘दुल्हा मिल जा… दुल्हा मिल जा… अच्छा वाला दुल्हा मिल जा… ‘ म्हणत होती. राखीच्या या कृत्याने तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. मात्र, पॅपराझींने तिचा प्रचंड आनंद लुटला.(dramaqueen rakhi sawant show technique to grow tomatoes in 15 days says will have no problem for 7 births)

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या नावावर आहे, सर्वाधिक हॉलीवूडपटांमध्ये काम करण्याच्या रेकॉर्ड

हे देखील वाचा