Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ओळखा पाहू कोण! बॉयकट हेअरस्टाईल अन् शाळेच्या ड्रेसमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसतेय खूपच क्यूट

ओळखा पाहू कोण! बॉयकट हेअरस्टाईल अन् शाळेच्या ड्रेसमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसतेय खूपच क्यूट

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहे ज्यांनी चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील छोटे मोठे किस्से शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक कलाकार असे आहेत, जे आपल्या सतत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. इतकेच नव्हे, तर चाहत्यांकडून देखील अशा पोस्टला चांगला प्रतिसाद आहेत. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. हे थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अशातच एका अभिनेत्रीने आपल्या शाळेच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला आहे.

हा फोटो बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा आहे. ती या फोटोमध्ये बॉयकट केस आणि शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सोबत तिची एक मैत्रीण देखील आहे. हा फोटो दुसऱ्या तिसऱ्या अभिनेत्रीचा नसून, बॉलिवूडची क्वीन म्हणजे अभिनेत्री कंगना रणौतचा आहे. हा फोटो कंगनाचे मूळ गाव हिमाचलमधील आहे. हा फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पोस्ट करताच हा फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे. (The actress looks very cute in her boycott hair and school dress)

या फोटोमध्ये कंगना निळ्या आणि पांढऱ्या शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर कंगनासोबत उभी असलेली तिची मैत्रीण पांढऱ्या रंगाच्या कुर्तीमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शन लिहिले की, “घाटीतील छोटी शाळा ज्याला हिल व्ह्यू म्हटले जाते. वर्ष १९९८ हिमाचल प्रदेश.”

या फोटोमध्ये कंगना बॉयकटमध्ये खूप क्यूट दिसत आहे. तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहेत. कंगनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक युजर्स तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच तिचा ‘थलायवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर या भूमिकेसाठी कंगनाचे खूप कौतुक केले गेले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा