Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड आलिया भट्टचे यश पाहून क्रिती सेनाॅनला वाटतो हेवा? अभिनेत्री म्हणाली, ‘मला पण इच्छा आहे…’

आलिया भट्टचे यश पाहून क्रिती सेनाॅनला वाटतो हेवा? अभिनेत्री म्हणाली, ‘मला पण इच्छा आहे…’

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. तिने खूप मेहनत करून तिचे स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्याच बरोबर अभिनेत्री क्रिती सेनाॅन देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रिती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

क्रितीच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. क्रिती सेनाॅनचा एक थ्रोबॅक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिती करण जोहरच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे. तिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ आहे, जो तिच्याशी सहमत आहे. अलीकडील दिलेल्या एका मुलाखतीत, होस्टने क्रितीचा थ्रोबॅक व्हिडिओ दाखवला होत आणि त्यावर प्रश्न केला.

व्हिडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देताना क्रिती (Kriti Sanon) म्हणाली की, “प्रामाणिकपणे, आम्ही एकत्र राष्ट्रीय पुरस्कार जिंकणे हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर होते. तुम्हाला चांगल्या संधी दिल्या गेल्यास, तुम्ही कुठून आलात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. तर, हे सर्व संधी मिळवण्याबद्दल आहे. मिमी आणि गंगूबाई सारख्या उत्तम संधी दररोज येत नाहीत.”

समोर आलेला व्हिडिओ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा आहे. या शोच्या 7व्या सीझनमध्ये क्रिती टायगरसोबत सहभागी झाली होती. यादरम्यान करणने क्रितीला विचारले होते की, समकालीन लोकांना नवीन उंची गाठताना पाहून तिला त्याच पातळीवर पोहोचण्याची प्रेरणा मिळते. यावर अभिनेत्री म्हणाली, “नक्कीच, हे मला प्रेरित करते, मला आणखी चांगले काम करण्यास प्रेरित करते. जेव्हा तुम्ही एखादे उत्तम काम पाहता तेव्हा तुम्हीही विचार करता. मलाही अशी संधी मिळाली असती.”

क्रिती सेनॉनने वर्षाची सुरुवात कार्तिक आर्यनसोबत ‘शेहजादा’ या चित्रपटातून केली आणि त्यानंतर ती प्रभास आणि सैफ अली खानसोबत ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसली. अलीकडेच ती टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चनसोबत गणपतमध्ये दिसली होती. तिच्याकडे 2024 साठी काही चित्रपट तयार आहेत. (The actress says that Kriti Sanon is jealous of Alia Bhatt success)

आधिक वाचा-
हेमा मालिनीला भेटताच भारावली रुपाली भोसले, म्हणाली, ‘मला साक्षात देवीचा आशीर्वाद…’
रेखा यांनी थेट स्टेजवर केला ‘या’ पोस्टरला वाकून नमस्कार; नेटकरी म्हणाले, ‘डोळ्यात पाणी..’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा