Thursday, February 22, 2024

रेखा यांनी थेट स्टेजवर केला ‘या’ पोस्टरला वाकून नमस्कार; नेटकरी म्हणाले, ‘डोळ्यात पाणी..’

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. त्यांनी त्यांच्या अभिनेयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. रेखा यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. रेखा यांचे लाखो चाहते आहेत. रेखा यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्या स्थरावर जातात. रेखा यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी नेहमीच आपल्या देशभक्तीसाठी ओळखल्या जातात. नुकतीच, त्यांनी विकी कौशलच्या आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर‘च्या स्क्रिनिंगमध्येही आपल्या देशभक्तीची झलक दाखवली. बुधवारी रात्री मुंबईतील एका चित्रपटगृहात या चित्रपटाची स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. रेखा यांनीही या स्क्रिनिंगला हजेरी लावली. रेखा व्यतिरिक्त कतरिना कैफ, विकी कौशलचे आई-वडील यांनीही या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. कॅमेऱ्यासमोर विकी कौशल त्याचे वडील शाम कौशल यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसला आणि त्याच्या या कृतीने देखील लोकांची मनं जिंकली.

रेखा या चित्रपटाच्या पोस्टरकडे वळल्या अन् जिथे विकी कौशल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसत आहे तिथे रेखा यांनी आपले दोन्ही हात जोडून पोस्टरकडे वाकून प्रणाम केला. रेखा यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रेखा यांचे सॅम माणेकशा यांच्या प्रतिमेला वाकून वंदन करणे हे लोकांना पसंत पडले आहे. कित्येकांनी कमेंट करत रेखा या खऱ्या देशभक्त आहेत असंही म्हंटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका युजरने लिहिले, “रेखा यांच्या या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, त्या खऱ्या देशभक्त आहेत.” दुसऱ्या युजरने लिहिले, “रेखा यांच्या या कृतीने माझ्या डोळ्यात पाणी आणले.” या चित्रपटात विकी कौशल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सान्या मल्होत्रा ​​ही या चित्रपटात आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (During the special screening of Sam Bahadur Rekha bowed to the poster on the stage and the video went viral)

आधिक वाचा-
जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री
हेमा मालिनीला भेटताच भारावली रुपाली भोसले, म्हणाली, ‘मला साक्षात देवीचा आशीर्वाद…’

हे देखील वाचा