टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश होय. ‘बिग बॉस 15’ ची विजेती बनल्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे. तेजस्वीने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेजस्वीची गणना टीव्हीच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती अनेकदा तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते असते. तेजस्वी सोशल मीडियावर सक्रिय असते.
कलर्स टीव्हीवरील प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘नागिन 6′ खूप गाजली आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक विषेश ओळख निर्माण केली आहे. या मालिकेने जवळपास दीड वर्षांच्या अद्भुत प्रवासानंतर अखेर प्रेक्षकांचा निरोप घेला आहे. रोहित शेट्टीचा रिअॅलिटी शो चालू होणार आहे. हा आठवडा ‘नागिन’च्या टेलिकास्टचा शेवटचा आठवडा आहे. एकता कपूरच्या संपूर्ण टीमने या मालिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे. तेजस्वी प्रकाशने (Tejashwi Prakash) ‘नागिन’च्या सेटवरील कलाकार आणि क्रूसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये तेजस्वीसोबत वत्सल सेठ आणि मेहक चहल दिसत आहेत. ‘नागिन 6’ मध्ये मेहक आणि तेजस्वी मुख्य भूमिका साकारताना दिसले. ‘नागिन-6’ चा शेवटचा एपिसोड या वीकेंडला म्हणजेच 9 तारखेला प्रसारित होणार आहे. शोमध्ये लीप केल्यानंतर वत्सल सेठ काही महिन्यांपूर्वी ‘नागिन’च्या टीममध्ये सामील झाला होता. दीड वर्ष चालणाऱ्या या मालिकेत एक लीपही आली. लीपपूर्वी सिम्बा नागपाल शोमध्ये मुख्य भूमिकेत होता, पण लीपनंतर सिम्बाने शो सोडण्याचा निर्णय घेतला.
The journey of Naagin 6 ends over here till we cross the same paths again #Naagin6WithTejasswiPrakash #VatsalSeth #TejasswiPrakash pic.twitter.com/mvoWMKfgCQ
— Tas (@mrsbirla) July 7, 2023
‘नागिन 6’साठी एकता कपूरने तेजस्वी राकेशला बिग बॉसच्या घरातच साइन केले होते. ‘नागिन’चा पहिला टीझर तेजस्वीने बिग बॉसच्या घरात शूट केला होता. यामुळेच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये ‘नागिन 6’चा चेहरा दाखवण्यात आला होता. बिग बॉस सीझन 15 संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने शोचे शूटिंग साठी सेटवर हजर झाली. चांगल्या टीआरपीमुळे या शोला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. आता जवळपास 6 महिन्यांचा ब्रेक घेऊन एकता कपूर ‘नागिन 7’सह टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. (The actress shared the information that Tejashwi Prakash’s ‘Naagin 6’ series will be closed)
अधिक वाचा-
– स्वत:च्याच लग्नात ऋषी कपूर-नीतू सिंग यांना आलेली चक्कर
–चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी गुरुदत्त होते टेलिफोन ऑपरेटर, वाचा त्यांच्याबाबत कधीही न ऐकलेल्या गोष्टी