Wednesday, December 6, 2023

लहान असताना तेजस्वी प्रकाशने केलाय बॉडी शेमिंगचा सामना, स्वतःच सांगितलेला ‘तो’ वाईट अनुभव । वाढदिवस विशेष

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (tejasswi prakash) ही टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. ‘बिग बॉस 15’ ची विजेती बनल्यानंतर तिची लोकप्रियता वाढली आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्वी प्रकाशला एकेकाळी बॉडी शेमिंगला बळी पडावे लागले होते.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची गणना टीव्हीच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती अनेकदा तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते, पण तिच्या शाळेच्या दिवसात ती अंगाने खूप पातळ होती, त्यामुळे तिचे वर्गमित्र तिची चेष्टा करायचे. एका मुलाखतीत तिने याविषयी सविस्तर माहिती दिली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तेजस्वी प्रकाशने सांगितले की, शाळेच्या दिवसात ती खूप पातळ होती आणि याच कारणामुळे तिची खिल्ली उडवली गेली. या अभिनेत्रीने सांगितले की, वर्गमित्र मला हंगर म्हणायचे आणि आम्ही शाळेच्या मैदानात खेळायला जायचो तेव्हा सगळे मला म्हणायचे की पाच रुपयांचे नाणे खिशात ठेव नाहीतर उडून जाईल.

हेही वाचा-
सैफ अली खानच्या ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातलेला धुमाकुळ, एकदा यादी वाचाच
‘परदेश’साठी ३००० मुलींमधून झाली होती महिमा चौधरीची निवड, असे आहे सिनेसृष्टीतील करिअर
‘हे’ बॉलिवूड कलाकार आहेत सर्वात रागीट, अनेकवेळा दिसला रुद्रावतार

हे देखील वाचा