Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’ चित्रपटात झाली अलाया एफची एन्ट्री; अभिनेत्रीने खास अंदाजात व्यक्त केला आनंद

एकता कपूर निर्मित ‘फ्रेडी’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट या महिन्याच्या सुरुवातीला एकता कपूरने चित्रपटाची घोषणा केली. तर या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत सर्वांना दिसणार आहे. तेव्हापासून चाहते या चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे अंदाज देखील बांधत होते. पण आता गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे आणि हे स्पष्ट झाले आहे की, अलाया एफ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.

अध्या नवीन चित्रपटांच्या घोषणेचा नुसता सपाटा लागला आहे. एकामागोमाग एक अनेक नवीन चित्रपटांच्या घोषणा होता आहे. डेली सोपं क्वीन असणाऱ्या एकता कपूरने देखील तिच्या आगामी ‘फ्रेडी’ चित्रपटाची घोषणा केली. या सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाच्या घोषणेनंतर लोकांना प्रश्न पडला होता की, या सिनेमात अभिनेत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार? अनेक अभिनेत्रीची नावे या चर्चेत होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. (alaya f join kartik aaryan in freddy)

‘फ्रेडी’ सिनेमातील मुख्य अभिनेत्रींचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अलाया एफ ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. अलाया एफने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या क्लॅपबोर्डसह एक फोटो शेअर केला आहे. क्लॅपबोर्डवर २१ ऑगस्ट आणि टेक क्रमांक १ ची तारीख आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “फ्रेडी साठी तयार. चित्रपटाच्या अद्भुत टीमसोबत काम करताना खूप आनंद होत आहे.”

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कार्तिक आर्यनने तिच्या पोस्टच्या आधीच सोशल मीडियावर अलायाची या चित्रपटात एन्ट्री झाल्याची माहिती दिली होती. त्याने अलाया एफचे मोनोक्रोम फोटो शेअर केले होते. या फोटोत अलाया केक कापताना दिसत आहे. या केकवर ‘वेलकम आलिया’ लिहिलेले आहे. हा फोटो शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वेलकम आलिया… फ्रेडीकडून.’

आलिया एफने कार्तिकच्या पोस्टवर देखील कमेंट दिली की, ‘तू ही पोस्ट करण्याचा निर्णय कधी घेतला !!!’ आलियाने कार्तिकच्या पोस्टवर आणखी एक कमेंट केली. आलियाने लिहिले की, ‘या चित्रपटात काम करताना खूप आनंद होत आहे.’

या महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाची शूटिंग मुंबईत सुरू झाली आहे. ‘फ्रेडी’ एक रोमँटिक थ्रिलर सिनेमा असणार आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असून, शशांक घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. पूजा बेदीची मुलगी आणि कबीर बेदीची नात असणाऱ्या आलिया एफने २०२० मध्ये ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

‘माझ्याशी नीट बोलायचं हं…!’ म्हणत प्राजक्ताने अतिशय हटके अंदाजात भावाला दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

‘रियल’ लाइफ भावाबहिणींच्या जोड्या, ज्या गाजवतायेत मोठा पडदा; तर ‘या’ कलाकारांचा आहे यादीत समावेश

हे देखील वाचा