Tuesday, April 23, 2024

‘द क्रू’ मधील करीना-तब्बू आणि क्रितीचा लूक समोर, एअर होस्टेसच्या वेशभूषेत अभिनेत्रींनीं जिंकले मन

राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रू’ या चित्रपटामुळे करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन (Kriti senon) चर्चेत आहेत. नुकताच फर्स्ट लूक व्हिडिओ जारी करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. त्याच वेळी, आज त्याचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये करीना, क्रिती आणि तब्बूचे लूक समोर आले आहेत. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

क्रिती सेननने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘द क्रू’ चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहेत. तिन्ही अभिनेत्री त्यांच्या लाल रंगाचा फ्लाइट अटेंडंट गणवेश परिधान करून छान दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चेक इन करण्यासाठी सज्ज व्हा, आता द क्रूसोबत उडण्याची वेळ आली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by SIFRA (@kritisanon)

 

‘द क्रू’ या चित्रपटात करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात तीन अभिनेत्रींशिवाय कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॉमेडी किंग कपिल या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. एकता कपूर आणि रिया कपूर या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करत आहेत. याआधी दोघांनी मिळून ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट केला होता.

‘द क्रू’च्या कथेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट तीन महिलांच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये एअरलाइन व्यवसायातील संघर्ष आणि अडचणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. करीना, तब्बू आणि करीना स्टारर चित्रपट ‘द क्रू’ 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रकुल- जॅकीच्या लग्नातील अनसीन व्हिडिओ समोर, समुद्रात मस्ती करताना दिसले नवविवाहित जोडपे
Sonu Sood: इतक्या श्रीमंत सोनू सूदच्या डिनरचे बिल भरलं एका अनोळख्या व्यक्तीने; नेमकं काय घडलं?

हे देखील वाचा