सिद्धार्थच्या निधनावर डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती; म्हणाले, ‘जेव्हा त्याला रुग्णालयात आणले…’

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने कुटुंब आणि चाहत्यांंसोबतच इंडस्ट्रीला देखील मोठा धक्का दिला आहे. असे सांगितले जात आहे की, वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्याने जगाचा निरोप घेतला. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, अभिनेत्याची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याचवेळी या रुग्णालयातील डॉक्टरांनी अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित माहिती सांगितली आहे.

रुग्णालयात आल्यानंतर…
मुंबईतील जुहू आरएन कूपर रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, ‘सिद्धार्थ शुक्लाला सकाळी ११ च्या सुमारास उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे ४० वर्षीय सिद्धार्थला मृत घोषित करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. परंतु शवविच्छेदनापूर्वी मृत्यूच्या कारणांची पुष्टी आम्ही करू शकणार नाही.’

शहनाज गिलची प्रतिक्रिया
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची खास मैत्रीण शहनाज गिलने सिद्धार्थबद्दल ही धक्कादायक बातमी ऐकताच शूटिंग सोडले. त्याचवेळी, रुग्णालयाच्या बाहेरूनही काही फोटो समोर आले आहेत. सिद्धार्थच्या कुटुंबात आई आणि दोन बहिणी आहेत.

शहनाजचे आणि सिद्धार्थचे कनेक्शन
विशेष म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. शहनाज गिल आणि सिद्धार्थची मैत्री ‘बिग बॉस १३’च्या दरम्यान सुरू झाली होती. त्याच वेळी, शोनंतरही दोघेही शेवटपर्यंत चांगले मित्र राहिले. चाहत्यांचा विश्वास होता की, दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु, ते नेहमीच एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. काही दिवसांपूर्वीच शहनाज गिल आणि सिद्धार्थ ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘डान्स दीवाने ३’ मध्ये दिसले होते.

सिद्धार्थचे करियर
सिद्धार्थ शुक्लाने २००८ मध्ये सोनी टीव्हीच्या ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या चित्रपटातून टीव्हीवर पदार्पण केले. यानंतर सिद्धार्थ ‘दिल से दिल तक’, ‘जाने पेहचन से… ये अजनबी’ यासह इतर अनेक शोमध्ये दिसला. सिद्धार्थला ‘बालिका वधू’ या मालिकेतून खरी ओळख मिळाली. सिद्धार्थने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’सारखे शो होस्ट केले, तर त्याने ‘बिग बॉस १३’ च्या आधी ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’चे सातवे पर्व जिंकले होते.

याव्यतिरिक्त सिद्धार्थने वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिद्धार्थ शेवटचा ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’ मध्ये दिसला होता. या सीरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ‘आयएमडीबी’वर जोरदार रेटिंग देखील मिळाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

-सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागील ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचा विषय

Latest Post