Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड जरा इकडे पाहा! ‘हवा हवाई’वर थिरकली जान्हवी कपूर, बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

जरा इकडे पाहा! ‘हवा हवाई’वर थिरकली जान्हवी कपूर, बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिली’ चित्रपटाचा यशाचा आनंद घेत आहे. यासोबतच ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. कार्यक्रमासोबतच ती टीव्ही रिऍलिटी शोमध्येही पाहुणी म्हणून हजेरी लावत आहे. ‘बिग बॉस 16‘ च्या घरात जाण्यापासून ते ‘झलक दिखला जा 10‘ च्या सेटला भेट देण्यापर्यंत तिने जवळपास प्रत्येक रिऍलिटी शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. आता ती ‘द कपिल शर्मा‘ शोमध्ये वडिल बोनी कपूर यांच्यासोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि कपिल शर्मा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर सेटवरील फोटो शेअर केले होते.

मेकर्स शोचा प्रोमो व्हिडिओही सतत शेअर करत आहेत. शोमध्ये जाण्यासाठी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने साडीचा लूक कॅरी केला हाेता. तिचा हा लूक तिची दिवंगत आई आणि अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या ‘चांदनी’ (Chandni) चित्रपटातील लूकशी जुळणारा दिसत आहे. जान्हवी तिचे वडील आणि मिली (Mili) चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत ‘द कपिल शर्मा'(The Kapil Sharma Show) शाेमध्ये पोहोचली होती.

जान्हवीने केला श्रीदेवीच्या ‘हवा हवाई’ या गाण्यावर डान्स
मेकर्सनी द कपिल शर्मा शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये जान्हवी श्रीदेवीच्या ‘हवा हवाई'(hawa hawai) या गाण्यावर नाचताना दिसत आहे. शोची संपूर्ण टीम या गाण्यावर डान्स करते, ज्याला जान्हवी कंपनी देते. कपिल याला दिवंगत श्री देवी यांना म्यूजिक ट्रिब्यूट म्हणतो. श्रीदेवीसोबत सुमोना चक्रवर्ती(Sumona Chakravarti), सृष्टी रोडे(Srishty Rode) आणि किकू शारदा (Kiku Sharda) यांनी देखील डान्स केला.

परफॉर्मन्स पाहिल्यानंतर बोनी कपूर म्हणतात, “श्रीदेवी एकच होती आणि आता कधीच राहणार नाही.”

जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपटाविषयी बाेलायचे झाले तर, हा चित्रपट मल्याळम थ्रिलर हेलनचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये सनी कौशल जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हे’ असेल आलियाच्या मुलीचे नाव, अभिनेत्रीने तीन वर्षांपूर्वीच केलेला खुलासा
अरे वाह! प्रशांत दामले यांनी 12,500 प्रयोगांचा टप्पा केला पार, सचिनने केले काैतुक

हे देखील वाचा