छोट्या पडद्यावरचा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. या शोमधून कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma) याला घराघरांत प्रसिद्धी मिळाली. त्याच्या या शोला लोकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता हा शो पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्माचा नवा लूक पाहून चाहते स्तब्ध झाले आहेत. कपिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो ओळखू देखील येत नाहीये. कपिल शर्माचा हा कमाल लूक त्याची पत्नी गिन्नी चतरथ हिनेच डिझाईन केला आहे.
View this post on Instagram
‘द कपिल शर्मा शो’ लवकरच छोट्या पडद्यावर परतणार असल्याची घोषणा देखील कपिल शर्माने केली आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकचा फोटो पोस्ट करून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या फोटोमध्ये कपिलचा लूक पूर्णपणे बदलला आहे. कॉमेडियनचा हा नवा अवतार पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक झाले आहेत.
‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीझनमध्ये कपिलची पत्नी गिन्नी चतरथ त्याच्यासाठी स्टायलिस्ट बनली आहे. फोटोत कपिलचा स्वॅग दिसत आहे. या लूकसाठी कपिलने काळ्या जीन्स आणि टी-शर्टवर पांढऱ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे. स्टायलिश गॉगलमध्ये तो खूप स्मार्ट दिसतो आहे.
या चित्रपटात दिसणार कपिल शर्मा
द कपिल शर्मा शोचा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय कपिलचा आगामी चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव झ्विगाटो आहे आणि त्यात कपिल एका डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दास यांनी केले आहे. या चित्रपटात कपिलची नायिका शहाना गोस्वामी असणार आहे. हा चित्रपट टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार असल्याने कपिल शर्मा खूप उत्सुक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘राजपुत आहे झुकणार नाही’, म्हणताच भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘आम्ही सगळे काय मोदींचे…’
ये भारत का तिरंगा है, झुकेगा नहीं! अल्लू अर्जुनची न्यूयॉर्कमध्ये डरकाळी, व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान
मुलाचा वाढदिवस साजरा करताना भावूक झाली इरफान खानची पत्नी, व्हिडिओ शेअर करत सांगितला ‘हा’ किस्सा