अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर त्यांच्या पिगी बँकेतील त्यांच्या आई-वडिलांचा जुना फोटो शेअर केला आहे. हा ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो आहे. यामध्ये त्यांचे वडील हातात पुस्तक वाचताना दिसत आहेत, तर फोटोसोबत त्यांची आईही उभी आहे. हे छायाचित्र अनुपम खेर यांच्या आई-वडिलांच्या तरुणपणातील आहे. यासोबतच अनुपम खेर यांनी ‘प्यासा’ चित्रपटातील एक गाणे एडिट केले आहे.
View this post on Instagram
अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “पुष्कर आणि दुलारीचा लग्नानंतरचा फोटो. वडिलांच्या जुन्या पेटीत हा सापडला. पेग लावल्यावर वडील अनेकदा हे गाणे गुणगुणायचे.” हा फोटो सिमलाचा आहे.अनुपम खेर यांच्या वडिलांचे नाव पुष्कर नाथ खेर आणि आईचे नाव दुलारी खेर आहे.(the kashmir files actor anupam kher shares a old photo of his parents with pyaasa song kangana ranaut reacted)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुम्ही लोक निर्लज्ज आहात’, म्हणणाऱ्यांवर भडकली रवीना; म्हणाली, ‘माझे शारीरिक शोषण…’
एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे मित्राला सपोर्ट करण्यासाठी पोहचली ‘मंडळी’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल