Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘भोपाळ’ वक्तव्यावरून ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अडचणीत, मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files ) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. दिग्दर्शकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी भोपाळीचा अर्थ समलैंगिक असा सांगितला आहे. या प्रकरणावरून एकच खळबळ उडाली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मी भोपाळमध्ये मोठा झालो आहे, पण मी भोपाळी नाही. कारण भोपाळीचा एक वेगळाच अर्थ आहे. मी तुम्हाला कधीतरी खासगीत समजावून सांगेन. एका भोपाळीला विचारा. भोपाळी म्हणजे समलैंगिक आहे, नवाबी हा छंद आहे.” विवेक अग्निहोत्री यांचे वक्तव्य समोर येताच ते ट्रोल होऊ लागले. विवेक अग्निहोत्री यांच्या वक्तव्याचा राजकीय वर्तुळातही निषेध होऊ लागला. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी दिग्दर्शकाच्या वक्तव्यावर टीका केली.

दिग्विजय सिंग यांनी विवेक अग्निहोत्री यांची उडवली खिल्ली
काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी या ट्विटरवर विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले की, “विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळ रहिवासी नाही. मी ७७ पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे. पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही रहा, संगतीचा प्रभाव असतो.” मात्र आतापर्यंत दिग्दर्शकाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. आपल्या या वादग्रस्त विधानावर दिग्दर्शक काय बोल हे पाहावे लागेल. आता त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटाने देशभरात वादळ आणलं आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा २०० कोटींच्या पुढे गेला आहे. छोट्या बजेटच्या या चित्रपटाच्या दमदार कमाईने सर्वांचेच होश उडाले आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची नॉनस्टॉप कमाई सुरूच आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा