‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


मनोरंजनसृष्टीमध्ये मागच्या बऱ्याच काळापासून कलाकार आणि ऑफ कॅमेरा काम करणाऱ्या अनेक लहान मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्यांचा घटना सुरु आहेत. अनेक कलाकारांनी त्यांचे आयुष्य संपवले आणि मागे सोडले अनेक प्रश्नचिन्ह.

काही दिवसांपूर्वीच ‘द कश्मीर फाइल्स’ची लाईन प्रोड्युसर असलेल्या सरहनाने ३० जून २०२१ ला आत्महत्या केली आहे. बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “ही सराहना आहे. जेव्हा मी देहरादून आणि मसूरीमध्ये शूट करत होतो तेव्हा ती ‘कश्मीर फाइल्स’ची लाईन प्रोड्युसर होती. चित्रपटाच्या संपूर्ण युनिटने मागच्यावर्षी २२ डिसेंबरला सेटवर तिचा वाढदिवस देखील साजरा केला होता. लॉकडाउनमुळे ती तिच्या घरी अलिगढला गेली. ती तिच्या कामात अतिशय हुशार होती. माझ्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने एक सुंदर मेसेज मला पाठवला होता. मात्र आज मला तिच्या फोनेवरून एक मेसेज येतो की, ‘सराहना आज आपल्यात नाहीये. ३० जूनला तिने आत्महत्या केली.’ हा मेसेज वाचून मी पूर्णतः हादरलो. हा मेसेज वाचून मी सर्वात आधी तिच्या आईला फोन केला, तेव्हा समजले ही बातमी खरी आहे.”

अनुपम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “आजच्या पिढीला नैराश्य मोठ्या प्रमाणात प्रभावित करत आहे. मी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. मी आशा करतो की तिच्या आईला आणि भावाला या दुःखातून बाहेर यायला देव शक्ती देवो. ओम शांती.”

विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा काश्मीरमधल्या हिंदू लोकांवर आधारित आहे. या सिनेमात अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भुमिकेत असून हा सिनेमा येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी थाटला तिने संसार; तर १७ व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

-जेव्हा विवाहित गुरू दत्त पडले होते वहिदा रहमान यांच्या प्रेमात; अजूनही उलगडलं नाही त्यांच्या मृत्यूचं रहस्य

-चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात


Leave A Reply

Your email address will not be published.