दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट गेले अनेक दिवसांपासून विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळत होते. कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याने या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. आज ( ११ मार्च) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र त्याआधीच काश्मिरमधील एका न्यायालयाने या चित्रपटातील काही दृश्ये दाखवण्यावर बंदी आणली आहे, ज्यामुळे आता पुन्हा एकदा या चित्रपटासमोरील अडचणी वाढल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. काय आहे हे संपुर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडीतांंच्या जीवनावर आधारित आहे. मात्र प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण या चित्रपटात भारतीय वायूसेनेचे दिवंगत अधिकारी रवी खन्ना यांच्यावर दाखवण्यात आलेली दृश्ये न दाखवण्याचा निर्मात्यांना आदेश दिला आहे. याबद्दल रवी खन्ना यांच्या पत्नी शालिनी खन्ना यांनी न्यायालयात धाव घेत चित्रपटात रवी खन्ना यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कथा दाखवण्यात आल्याचा आरोप केला होता. याच खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
याबाबत बोलताना शालिनी खन्ना यांनी सांगितले की, “याबद्दल त्यांनी चित्रपट निर्मात्यांशी चर्चा केली होती. मात्र त्यांच्या या सुचनांकडे निर्मात्यांनी दुर्लक्ष केले.” याबाबत निर्मात्यांनी शालिनी खन्ना यांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने, त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. यावर जम्मू काश्मिर न्यायालयाचे न्यायाधिश दिपक सेठी यांनी आपल्या आदेशात रवी खन्ना यांच्यावरील दृश्ये न दाखवण्याची सुचना चित्रपट निर्मात्यांना केली आहे.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-