Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड ‘भारतीय राजकारणातले सर्वात भ्रष्ट नेता’, म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी साधला शरद पवारांवर निशाणा

‘भारतीय राजकारणातले सर्वात भ्रष्ट नेता’, म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी साधला शरद पवारांवर निशाणा

विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. केवळ भारतातच नाही तर परदेशातही सिनेमाने चांगलीच कमाल केली. समीक्षण आणि प्रेक्षक दोघांनीही या सिनेमाला अतिशय प्रेम दिले. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि नरसंहार यात दाखवला गेला आहे. या सिनेमाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, तर काहींनी कडाडून विरोध देखील केला.

बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केलेल्या या सिनेमाला प्रदर्शित होऊन अनेक आठवडे उलटले मात्र अजूनही या सिनेमाच्या चर्चा आजही गाजताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेल्या शरद पवारांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते की, ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा फक्त आणि फक्त लोकांमध्ये त्वेष निर्माण करण्यासाठी बनवला गेला आहे. आता विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शरद पवारांच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे.

कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, “‘द काश्मीर फाईल्स’ नावाने बनवलेला सिनेमा लोकांमध्ये तिढा निर्माण करत त्यांच्या धार्मिक भावनांना भडकवण्याचे काम करत आहे.” हे पहिल्यांदा नाही तर याआधी देखील पवारांनी या सिनेमाबद्दल अनेक व्यक्तव्य केली होती. ते एकदा म्हणाले होते की, “एका माणसाने सिनेमा बनवला आहे, ज्यात हिंदूंवर होणारे अत्याचार दाखवले गेले. यात दाखवले गेले की, कशाप्रकारे बहुसंख्यांक समुदाय लोकांवर अत्याचार करतात. हे अतिशय दुर्दैवी आहे की, सत्तेत असणारे लोकंच या सिनेमाला प्रोत्साहन देत प्रमोट करत आहे.

शरद पवारांच्या या व्यक्तव्यावर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. विवेक यांनी सांगितले की, “पुन्हा खोटे, दुतोंडीपणा आहे हा. भारतीय राजनीतीमधील आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट नेता खऱ्या आयुष्यात सर्वात जास्त पाखंडी आहे. मला एकट्यात काश्मिरी पंडितांबद्दल वेगळेच सांगतात आणि सार्वजनिक ठिकाणी वेगळेच बोलतात. कर्म पवार साहेब…कर्म कोणालाच क्षमा करत नाही.” ११ मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने २०० कोटींचा व्यवसाय केला असून लवकरच विवेक ‘द दिल्ली फाईल्स’ सिनेमा घेऊन येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा