Friday, July 5, 2024

अदा शर्माच्या चित्रपटाची तुलना ‘द काश्मीर फाइल्स’शी; ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या दिवशी केली तब्बल ‘इतक्या’ काेंटीची कमाई

द केरळ स्टोरी‘ हा वादग्रस्त चित्रपट शुक्रवारी (5 मे)ला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. अदा शर्माच्या चित्रपटाची गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स‘शी तुलना केली जात आहे, परंतु पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत त्याने ‘द काश्मीर फाइल्स’ला मागे टाकले आहे.

सध्या सोशल मीडियापासून तर राजकीय क्षेत्रातपर्यंत, ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे ‘द केरळ स्टोरी’. हा चित्रपट त्याच्या आशयामुळे प्रचंड वादात सापडला आहे. इतकेच नव्हे तर, हे प्रकरण न्यायलयात पाेहाेचले आहे. काही समुदायांचे म्हणणे आहे की, ‘या चित्रपटामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आणि त्यामुळे देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो.’ अशात ‘द केरळ स्टोरी’ची पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे

माध्यमातील वृत्तानुसार, केरळ स्टोरीने पहिल्या दिवशी 7.5 कोटी ते 8 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह ‘द केरळ स्टोरी’ या वर्षातील पाचवा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

मंडळी, या चित्रपटाची शनिवार आणि रविवारी जबरदस्त कमाई होण्याची अपेक्षा आहे. कारण, चित्रपटाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर निवडणूक रॅलीत ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचाही उल्लेख केला आहे. दुसरीकडे, या चित्रपटाची तुलना विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’शी केली जात आहे, ज्याने पहिल्या दिवशी केवळ 3.55 कोटींचा व्यवसाय केला. सुदीप्तो सेन दिग्दर्शित, या चित्रपटात तीन मुलींची कथा आहे, ज्या धर्मांतराच्या कटाला बळी पडतात.(the kerala story box office collection day 1 bollywood actress adah sharma the kerala story earn more than 7 crore on opening day )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इतक्या वर्षानतर अखरे आयुष्यमानने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा; म्हणाला, ‘चित्रपटांशिवाय जगू शकतो पण…’

Vindu Dara Singh Birthday: सुरुवातीच्या काळात सलमान खानसोबत काम केल्याने वडिलांसारखी ओळख निर्माण करता आली नाही

हे देखील वाचा