‘द केरळ स्टाेरी’ या चित्रपटावरून वाद सुरु असला तरी हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटीचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटातील कलाकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा मात्र सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काय आहे ते कारण, चला तर जाणून घेऊयात…
अदा शर्माने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात शालिनीची भूमिका साकारली आहे, जी चाहत्यांना खूप आवडली आहे. एकीकडे या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये कमावल्याबद्दल अभिनेत्री अदा शर्मा खूप खूश आहे. पण दुसरीकडे अदा शर्मा एका मोठ्या अडचणीत अडकली आहे.
अदा शर्माचे पर्सनल काॅन्टॅक्ट डिटेल्स लीक झाले आहे. त्यामुळे अदा शर्मा खूप अडचणीत आहे. एका इंस्टाग्राम युजरने अदाचा नंबर लीक केला आहे. तो इतक्यावरच थाबला नाही. तर त्याने अदाचा नवीन काॅन्टॅक्ट नंबरही लीक करेल, अशी धमकी दिली आहे.
View this post on Instagram
मात्र, ज्या अकाऊंटमधून नंबर लीक झाला आहे ते अकाऊंट बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी अदा शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. चाहत्यांनी या युजरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘झामुंडा_बोल्ते’ नावाच्या इंस्टाग्राम यूजरने अदाचा हा तपशील इंस्टाग्रामवर लीक केला आहे.
दरम्यान, या चित्रपटातील अदा शर्माच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करत आहेत. द केरळ स्टोरी चित्रपटामध्ये शालिनी ही फातिमा कशी होते? हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि इडनानी याच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
अदा शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘द केरळ स्टोरी’ नंतर अदा शर्मा आता श्रेयस तळपदेसोबत ‘द गेम ऑफ गिरगिट’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अदा आणि श्रेयसचा हा चित्रपट वादग्रस्त इंटरनेट गेम ‘ब्लू व्हेल चॅलेंज’वर आधारित आहे.