ब्यूटी पेजेंट आणि मॉडलिंग ते टीव्ही असा प्रवास गाठणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आता तिच्या पुढच्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी उत्सुक आहे. दिव्यांका त्रिपाठीच्या ‘द मॅजिक ऑफ शिरी’ या वेबसिरीजचा टीझर समोर आला आहे. दिव्यांका तिच्या आगामी वेब सीरिजमध्ये एका सक्षम मॅजेशियनची भूमिका साकारत आहे.
या मालिकेत दिव्यांका (divyanaka tripathi) एका सामान्य स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी एक महान जादूगार बनण्याचे स्वप्न पाहते. अशा परिस्थितीत घरातील कामे उरकून जादूगार बनण्याचे स्वप्न पाहणे हा तिचा आवडता छंद असेल. मात्र, तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनतही करताना दिसत आहे. मात्र, जेव्हा ती मोठ्या पदावर येते, तेव्हा एक मेल जादूगार या क्षेत्रात महिलेने काम करावं असं वाटत नाही. या सीरीजमध्ये अभिनेता जावेद जाफरी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून तो एका मोठ्या जादूगाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
या मालिकेच्या टीझरमध्ये दिव्यांकाचा लूक खूपच साधा आहे, पण दिव्यांका मॅजेशियनच्या आऊटफिटमध्ये येताच ती खूपच रहस्यमय दिसते, टीझरच्या काही शॉट्समध्ये मॅजेशियनच्या नॉर्मल लाइफमधील देखील दृश्ये आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पती आणि मुलांसोबत स्कूटरवरून प्रवास करताना दिसत आहे. दिव्यांकाची ही सीरीज एका घरगुती स्त्रीच्या संघर्षाची कथा आहे, जिला तिच्या झोनमधून बाहेर पडून तिच्या आवडीनुसार काहीतरी वेगळे करायचे आहे. अशा परिस्थितीत सीरीजमधील हा प्रवास किती कठीण जाणार आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे. दिव्यांका त्रिपाठीला टीव्ही शोमध्ये सर्वोत्कृष्ट सून ‘इशिता’ म्हणून ओळखले जाते. मात्र, दिव्यांका या वेब सिरीजच्या माध्यमातून ती तिची ही प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.( the magic of shiri teaser out actress divyanaka tripathi dahiya as in jadugarni javed jaffrey to be in a dangerous villain)
अधिक वाचा-
“…तर मी दोन मुलांची आई असते”, अभिनेत्री केतकी चितळेच मोठ वक्तव्य; एकदा वाचाच
‘नातेवाईकच मुलींसोबत बला’त्कारासारखे घृणास्पद…’, हे काय बाेलून गेली उर्फी जावेद? व्हिडिओ एकदा पाहाच