कोरोना व्हायरस (Covid- 19) ने गेल्या दोन वर्षांपासून जगभरात दहशत निर्माण केली आहे आणि आता त्याचा आलेला नवीन प्रकार लोकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. अलीकडेच, भारतातही कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटची पहिली दोन प्रकरणे आढळून आली आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट देशात दाखल होताच, ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाच्या एका चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. हे पोस्टर पाहून असे दिसते की, जणू काही वर्षांपूर्वी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अंदाज आला होता.
हॉरर-थीम असलेल्या पोस्टरमध्ये एक मुलगा आणि मुलगी ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे भीतीने पाहत असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी त्यांच्या मागे रक्ताने माखलेला एक मोठा हात दिसत आहे. त्याच्या हातावर एक मुंगीही दिसत आहे. या पोस्टरची टॅगलाइन आहे, “ज्या दिवशी पृथ्वी स्मशानात बदलेल.” (the omicron variant movie poster viral on social media truth behind viral pic)
I Photoshopped the phrase "The Omicron Variant" into a bunch of 70s sci-fi movie posters #Omicron pic.twitter.com/1BuSL4mYwl
— Becky Cheatle (@BeckyCheatle) November 28, 2021
हे पोस्टर व्हायरल होताच, सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंटचा अंदाज फार पूर्वीच आला होता. सोशल मीडियावर हे पोस्टर सतत रिट्विट केले जात आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
खरं तर, हे पोस्टर आयरिश दिग्दर्शक बेकी चीटलने बनवले आहे. हे पोस्टर तिने गंमतीने बनवले होते. १९७४ साली आलेल्या Sucesos en la cuarta fase फेज IV चे पोस्टर एडिट करून, तिने ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ चे पोस्टर बनवले होते, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर, चीटलने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने स्पष्ट केले की, हे पोस्टर एक विनोद आहे, जे तिने केवळ मनोरंजनासाठी बनवले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा