Friday, March 29, 2024

‘या’ सत्यघटनेवर असणार यशराज फिल्म्सची पहिली वेबसीरिज, होणार नवा धमाका

चित्रपटसृष्टीतील प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या वेबसीरिजला खूप महत्व दिले जात आहे. मग याबाबत यशराज फिल्म्स का बरं मागे राहतील. अशातच गुरुवारी (२ डिसेंबर) यशराज फिल्म प्रोडक्शनने त्यांच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. ही वेबसीरिज १९८४ मध्ये झालेल्या भोपाळ गॅस कांडवर आधारित असणार आहे. ही घटना २-३ डिसेंबर १९८४ साली झाली होती. २०२१ साली या घटनेला ३७ वर्ष पूर्ण झाले आहेत. अशातच यशराज फिल्म्सने या वेबसीरिजची घोषणा केली आहे. 

या वेबसीरिजचे नाव ‘रेलवे मॅन’ आहे. या वेबसीरिजमध्ये चार कलाकार असणार आहेत. या वेबसीरिजमध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान देखील असणार आहे. यासोबत आर. माधवन, केके मेनन आणि मिर्झापूर फेम दिव्येंदू हे कलाकार असणार आहेत. ही वेबसीरिज बरोबर एक वर्षानंतर २ डिसेंबर २०२२ साली प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये ‘द रेलवे मॅन’चे दिग्दर्शन शिव रवेल करणार आहेत. त्यांचे देखील दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. ही वेबसीरिज एका ग्रँड स्तरावर बनवणार आहे. यातून गॅस कांड हिरोजला ट्रिब्युट देणार येणार आहे. ही बातमी ऐकून त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत. (The railway men based on bhopal gas tragedy announced by yashraj films)

या वेबसीरिजमध्ये १९८४ मध्ये झालेली गॅस ट्रॅजेडी दाखवण्यात येणार आहे. ज्यामध्ये १५,००० लोकांचा मृत्यू एका रात्रीत झाला होता. या घटनेत भोपाळमध्ये त्या दिवशी ४० टन मिथाइल आइसो साइनाईड गॅस लीक झाला होता. या घटनेवरून भोपाळ ए प्रेयर ऑनरेन हा चित्रपट बनवला गेला होता. यशराज फिल्म्सची ही वेबसीरिज पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा