Wednesday, July 3, 2024

साराचा वर्कआऊट पाहून तुमच्याही बत्त्या होतील गुल; फिगर मेंटेन करण्यासाठी ‘अशी’ घेते मेहनत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सारा तिच्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सारा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणिफिटनेसचे व्हिडिओ देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेकदा अभिनेत्रींना पाहून त्यांच्या फिटनेसबद्दल अनेक चाहत्यांना प्रश्न पडत असतो की, या अभिनेत्री इतक्या फिट असतात तरी कशा. त्यांच्या फिटनेसच्या रहस्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकतेच आता साराने तिच्या फिटनेसचं रहस्य चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.

चित्रपटात येण्यापूर्वी साराचे वजन खूप होते, पण तिने तिचे बरेच वजन कमी केले. योग्य वजन मिळवण्यासाठी साराने व्यायाम करून भरपूर घाम गाळला. सारा तिच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी नियमित वर्कआऊट आणि डाएट चार्ट फॉलो करते. जाणून घेवूया साराच्या फिटनेसचा रहस्य.

साराचा नियमित वर्कआऊट
सारा पुश अप्स, लीपिंग स्क्वॉट्स, योगासन, वेटलिफ्टिंग, ट्रेडमिल बनी हॉपिंग, केटलबेल ट्रेनिंग आणि पायलेट्स तिच्या वर्कआऊट्समध्ये समाविष्ट करते. साराने इंस्टाग्रामवर अनेक वेळा योगा करताना तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. कोरोनादरम्यान, सारा लोकांना घरी राहून तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत होती. तिने आपल्या चाहत्यांना तबाता वर्कआऊटबद्दलही सांगितले. खरंतर, या कसरतीमध्ये तुम्हाला एकापाठोपाठ अनेक वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. साराने तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशा ८ व्यायामांबद्दल सांगितले होते.

साराचा डाएट चार्ट
सारा प्रामुख्याने तिची फिगर आकारात ठेवण्यासाठी आणि वजन आटोक्यात आणण्यासाठी प्रोटीन आहार घेते. माध्यमांतील वृत्तांनुसार, सारा मासे, पांढरी अंडी, हिरव्या भाज्या आणि ताज्या फळांचा रस तिच्या आहारात समाविष्ट करते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

हे देखील वाचा