Monday, October 2, 2023

पंडितांच्या घरात जन्माला येणार मुस्लिम बाळ? विकी कौशलच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

विकी कौशल हा सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे, जो नेहमी त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतो. ‘जरा बचके जरा हटके‘ नंतर प्रेक्षक त्याच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली‘ या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीचा प्रतिभावान अभिनेता विकी कौशल ( Vicky Kaushal) ‘जरा हटके जरा बचके’ नंतर पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. हास्याचा डोस भरलेला त्यांचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family)  हा चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाची वाट पाहत असलेल्या लोकांना या मनोरंजनाची झलक दाखवत निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे.बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ 22 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट एका विनोदी कुटुंबाची कथा सांगतो. विकी कौशल या चित्रपटात भजन कुमार नावाच्या स्थानिक गायकाची भूमिका साकारतो. तो लहानपणापासूनच गाण्याचा शौकीन आहे, पण त्याच्या विचित्र कुटुंबामुळे तो त्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करू शकत नाही.

चित्रपटाच्या टीझरमध्ये विनोदी कौटुंबिक नाटकाची झलक पाहायला मिळाली. त्याची कथा विकी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबाभोवती फिरते. टीझरमध्ये, कलाकार कौटुंबिक संबंधांच्या महत्त्वावर उत्कटतेने चर्चा करतात. तो आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल भावूक होतो

चित्रपटात मानुषी छिल्लर विकीच्या प्रेमिकाची भूमिका साकारते. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, विकी आणि मानुषीची जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटात यशपाल शर्मा, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, सृष्टी दीक्षित यांसारख्या कलाकारांनी देखील काम केले आहे. यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा या सिनेमाची निर्मिती करत आहे. (The trailer release of famous actor Vicky Kaushal movie The Great Indian Family)

अधिक वाचा-
अभिनेत्री नुसरत जहाँ यांची ईडीकडून ‘या’ प्रकरणात चौकशी सुरू; वाचा सविस्तर
उरल्या सगळ्या त्या आठवणी…! ‘सलमान’वर दु;खाचा डोंगर; अभिनेत्याच्या आत्याचं निधन

हे देखील वाचा