‘द ट्रेटर्स’ (The Traitors) या शोचे विजेते ठरले आहेत! या दोघांनी शेवटपर्यंत स्मार्टपणे खेळत धोखेबाजांपासून स्वतःचा बचाव केला आणि जिंकून दाखवलं. आता त्यांना मिळणार आहे थेट एक कोटींचं बक्षीस!
करण जोहर फक्त दिग्दर्शकच नाही, तर जबरदस्त होस्टसुद्धा आहेत! त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आहेत आणि चॅट शो, रिअॅलिटी शो होस्ट करताना त्यांना लोक खूप आवडतात. अलीकडेच त्यांनी ‘द ट्रेटर्स’ हा रिअॅलिटी शो होस्ट केला होता, आणि प्रेक्षकांनी तो खूपच एन्जॉय केला. या शोमध्ये बरेचसे कलाकार सहभागी झाले होते. आता या शोचा विजेता कोण ठरला, याची घोषणा झाली आहे!
उर्फी जावेद आणि पोकर प्लेयर निकिता लूथर या दोघी ‘द ट्रेटर्स’ शोच्या विजेत्या ठरल्या आहेत! या शोचा शेवटचा एपिसोड ३ जुलैला अमेझॉन प्राइमवर आला आणि त्यात उर्फी आणि निकिताने ट्रॉफी जिंकली हे उघड झालं. लोकांना वाटत होतं की, अपूर्वा मुखिजा किंवा हर्ष गुजराल यापैकी कोणी तरी जिंकेल, पण तसं झालं नाही. शोच्या फिनालेत उर्फी आणि निकिताने गद्दारांना ओळखून त्यांना गेममधून बाहेर केलं आणि शेवटी विजय मिळवला!
हा शो एकदम हटके होता! काही स्पर्धक गुपचूप “गद्दार” म्हणून निवडले गेले होते. त्यांचं काम होतं, उरलेले निर्दोष स्पर्धक कोणाला कळू न देता गेममधून बाहेर काढणं. प्रत्येक रात्री गद्दार एक निष्पाप स्पर्धकला गेममधून हटवायचे आणि बाकीचे स्पर्धक, जे निर्दोष होते ते रोजच्या मतदानातून गद्दार कोण आहे हे शोधायचा प्रयत्न करायचे. जर त्यांनी सगळे गद्दार ओळखले असते, तर ते बक्षीस जिंकले असते. पण जर एक जरी गद्दार शेवटीपर्यंत वाचला असता, तर मग सगळ्या निर्दोषांचा गेम फसला असता आणि बक्षीस गद्दाराच्या नावावर गेलं असतं!
उर्फी जावेद आणि निकिताने कित्येक आठवडे स्मार्टपणे खेळून स्वतःला धोखेबाजांपासून वाचवलं आणि शेवटी हा टायटल जिंकला! या दोघींना आता एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. ‘द ट्रेटर्स’चा पहिला सीझन तर संपलाच, पण आता प्रेक्षक दुसऱ्या सीझनसाठी उत्सुक झालेत!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
नकारात्मक भूमिकांसाठी एकेकाळी होत्या प्रसिद्ध; आज बदलून टाकली संपूर्ण प्रतिमा…