Tuesday, March 5, 2024

हृदयविकाराच्या झटक्यानंतर अशी झाली होती सुनील ग्रोवरची अवस्था; म्हणाला, “माझं नशीब…”

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरच्या आयुष्यात गेल्या वर्षी अनेक चढउतार आले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर चार बाईपास सर्जरी झाल्या, ज्यानंतर त्याला सात दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आले. अॅडमिटच्या वेळी तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचेही आढळून आले हाेते. अशात काॅमिडियन आता त्याच्या आरोग्याच्या भीतीबद्दल बोलला आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

सुनील ग्रोव्हर (sunil grover) याने सिद्धार्थ कन्ननला सांगितले की, “मी आधीच कोविडशी लढत होतो आणि नंतर हा हृदयविकाराचा झटका आला. त्याचा सामना करून जीवनात पुढे जावे लागेल. अशात तुमचे मन वेगवेगळ्या विचारांनी गुरफटून जाते. ते 1-2 महिने माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या कठीण होते, परंतु आता मला वाटते की, सर्व काही ठीक आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

45 वर्षीय सुनील ग्रोव्हर पुढे म्हणाला, “अशा वेळी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला लागता…हे ठीक होईल का? मी कधी पुनरागमन करू शकेन की नाही? पण सुदैवाने, सर्व काही चांगले झाले. आता मी पूर्णपणे ठीक आहे आणि माझ्या कामाचा आनंद घेत आहे.”

माध्यमातील वृत्तांनुसार, काॅमेडियनला अॅडमिट केल्यानंतर आठवडाभराने अँजिओग्राफी करण्यात आली. कराण, अभिनेत्याच्या हृदयात ब्लॉकेज झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुनील ग्रोव्हरने दोन महिन्यांनी पुन्हा काम सुरू केले. तो आता शाहरुख खानसोबत ‘जवान’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.(tv actor sunil grover on suffering heart attack says i thought i would never bounce back again)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध गायकाच्या पत्नीनेच त्याच्यावर लावला बलात्काराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

हे देखील वाचा