पन्नासच्या दशकाचा काळ हिंदी सिनेमासाठी सुवर्णकाळ होता. त्याकाळी, एकापेक्षा एक अभिनेते-अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते होते, ज्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद यांसारखे सुपरस्टार राज्य करायचे. त्या काळातल्या सौंदर्यवतींबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये मधुबाला, नर्गिस दत्त, वहीदा रहमान यांसारख्या अभिनेत्री प्रेक्षकांवर आपली जादू करायच्या. याशिवाय चित्रपटसृष्टीकडे बिमल रॉय, मेहबूब खान, गुरुदत्त आणि बी.आर. चोप्रासारखे चित्रपट निर्मातेही होते. आज आम्ही तुम्हाला पन्नासच्या दशकातील काही उत्तम चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. तुम्ही हे चित्रपट अजून पाहिले नसतील, तर लगेच पाहा.
बाबुल (1950)
सन1950 मध्ये आलेल्या ‘बाबुल’ या चित्रपटात दिलीप कुमार, नर्गिस दत्त आणि मुनव्वर सुलताना मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन एस. यू. सनीने केले होते. या चित्रपटाची कथा एका तरुण पोस्टमनवर होती, जो एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात लव्ह ट्रायअँगल दाखवण्यात आला आहे, ज्यात बरेच ट्विस्ट होते. हा त्या काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.
आवारा (1951)
जुन्या चित्रपटांची चर्चा असेल आणि जर राज कपूर यांचे नाव घेतले नाही, त्यात तर हा मोठा अन्याय होईल. आता आम्ही बोलत आहोत ‘शोमॅन’राज कपूरच्या ‘आवारा’ या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात कपूर घराण्यातील तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. होय, राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी या चित्रपटात वडिलांची भूमिका केली होती. याशिवाय राज कपूरचे आजोबा बशेश्वरनाथ कपूर यांनीही चित्रपटात एक कॅमिओ केला होता. तसेच या चित्रपटात शशी कपूर देखील होते. त्यांनी राज कपूरच्या तरूणपणीची भूमिका केली होती. या चित्रपटात राज कपूर आणि नर्गिस दत्त मुख्य भूमिकेत होते.
बाझी (1951)
सुपरस्टार देव आनंद यांनी गुरुदत्तच्या ‘बाझी’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या गुन्हेगारी- नाटक चित्रपटात देव आनंद यांनी एका जुगाऱ्याची भूमिका साकारली होती, ज्यावर डान्सरची हत्या केल्याचा आरोप होता. या चित्रपटातील डान्सरची भूमिका अभिनेत्री गीता बाली यांनी साकारली होती. ‘बाजी’ चित्रपटात प्रेम, नाटक, गुन्हेगारी, सस्पेन्स सर्वकाही पाहायला मिळेल.
बैजू बावरा (1952)
संगीतासाठी एखादा चित्रपट तयार झाला आणि त्याने यशाची नवीन विक्रम केले, क्वचितच असे पाहायला मिळते. ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. 1952 साली रिलीझ झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपट तब्बल 100 आठवड्यांपर्यंत चित्रपटगृहात चालला. या चित्रपटामध्ये भरत भूषण आणि मीना कुमारी मुख्य भूमिकेत होते, तर दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केले होते.
दो बीघा जमीन (1953)
दिग्दर्शक बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बीघा जमीन’ हा एक सामाजिक नाटक चित्रपट होता. या चित्रपटात बलराज साहनी आणि निरुपा रॉय मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कथा एक गरीब शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाच्या परिश्रमांवर आधारित होती. जो त्याची जमीन जमीनदारपासून वाचवण्यासाठी धडपडत असतो.
परिणीता (1953)
सन १९५३ मध्ये रिलीझ झालेला ‘परिणीता’ हा चित्रपट अशोक कुमार आणि मीना कुमारी यांचा एक रोमान्स नाटक चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. याची कथा शरतचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘परिणीता’ या बंगाली कादंबरीवर आधारित होती. चित्रपटाची कहाणी दोन लोकांमधील प्रेम आणि द्वेष या दोन्ही गोष्टी दाखवते.
बूट पाॅलिश (१९५४)
प्रकाश अरोरा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती राज कपूर यांनी केली होती. या चित्रपटात अशा दोन भावंडांची कहाणी दाखविण्यात आली आहे, जे त्यांच्या काकूच्या म्हणण्यावरून सक्तीने भीक मागायचे. मग जॉन काकांच्या सांगण्यावरून, दोन्ही मुले बूट पॉलिश किट घेतात आणि लोकांचे बूट पॉलिश करण्यास सुरवात करतात. दरम्यान, दोन्ही भावंडे एकमेकांपासून विभक्त होतात आणि शेवटी कसेतरी भेटतात. ही या चित्रपटाची मुख्य कहाणी आहे.
श्री 420 (1955)
राज कपूर यांनी बनवलेल्या महान चित्रपटांपैकी एक म्हणजे चित्रपट ‘श्री 420’. चित्रपटात राज कपूर यांनी स्वत: मुख्य अभिनेता म्हणून काम केले आहे. याशिवाय या चित्रपटात नर्गिस दत्त मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट एका गरीब मुलीची कथा आहे, जी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अलाहाबादहून मुंबईला येते.
मिस्टर अँड मिस 55 (1955)
‘मिस्टर अँड मिस 55’ हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात गुरुदत्त आणि मधुबाला मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कहाणी खूपच मनोरंजक आहे. गुरदत्त यांनी हा चित्रपट बनविला होता.
झनक झनक पायल बाजे (1955)
आता बोलुयात व्ही शांताराम दिग्दर्शित ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाबद्दल. चित्रपटाची कथा एका प्रेमकथेवर आधारित होती.या चित्रपटात गोपी कृष्णा यांच्यासोबत, दिग्दर्शक शांताराम यांच्या पत्नी संध्या मुख्य भूमिकेत होत्या.
अधिक वाचा-
–दिव्यांका त्रिपाठीने केला तिच्या ब्रेकअपचा अनुभव शेअर, ‘या’ अभिनेत्याची रोज गाळायची अश्रू
–स्ट्रगलचे दिवस आठवून दिव्यांका त्रिपाठीची व्यथा; म्हणाली की, ‘मेकर्स म्हणायचे, तुला कोणी पाहणार नाही’