Tuesday, December 3, 2024
Home टेलिव्हिजन टिव्हीवर श्रीकृष्णांच्या भूमिका साकारुन लोकप्रिय ठरलेत ‘हे’ कलाकार, पाहा कोण आहेत ते दिग्गज

टिव्हीवर श्रीकृष्णांच्या भूमिका साकारुन लोकप्रिय ठरलेत ‘हे’ कलाकार, पाहा कोण आहेत ते दिग्गज

पौराणिक मालिकांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कला आणि गुण चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्री कृष्णावर आधारित अनेक शोज आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तसेच या शोमध्ये श्री कृष्णाची भूमिका करणारे स्टार्सही खूप लोकप्रिय झाले होते. कोण आहेत ते स्टार्स, जाणून घेऊया…

सर्वदमन बॅनर्जी – सर्वदमन बॅनर्जी हे टीव्हीवर श्री कृष्ण बनलेल्या सुरुवातीच्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. रामानंद सागर यांच्या 1993 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘कृष्णा’ या मालिकेत त्यांनी भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. याआधी त्याने काही चित्रपटांमध्ये पौराणिक व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

नितीश भारद्वाज – अभिनेते नितीश भारद्वाज हे टीव्हीवरील सर्वाधिक पसंतीचे आणि लोकप्रिय कृष्णांपैकी एक आहेत. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत त्याने कृष्णाची भूमिका साकारली होती. नितीश यांनी ही व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली आहे. याच कारणामुळे तो आजही या व्यक्तिरेखेसाठी सर्वाधिक ओळखला जातो. नितीश हे भारतीय जनता पक्षाचे जमशेदपूरचे खासदारही राहिले आहेत.

सौरभ राज जैन – अभिनेता सौरभ राज जैन यानेही श्रीकृष्णाची भूमिका करून खूप यश मिळवले. 2013 मध्ये स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या ‘महाभारत’मध्ये तो कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. तसेच हा कार्यक्रम नव्या युगातील प्रेक्षकांनाही आवडला होता.

सुमेध मुदगल- ‘राधाकृष्ण’ या लोकप्रिय पौराणिक शोमध्ये भगवान कृष्णाच्या भूमिकेत सुमेध मुदगलकरला खूप आवडले होते. हा स्टार भारत शो राधा आणि श्रीकृष्णाच्या प्रेमकथेवर आधारित होता. शोमध्ये सुमेध कृष्णाच्या भूमिकेत दिसला, तर मल्लिका सिंह राधाच्या भूमिकेत दिसली. या मालिकेतील सुमेधच्या छोट्या क्लिपही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या आहेत.

विशाल करवाल- ‘द्वारकाधीश-भगवान श्री कृष्ण’ या मालिकेत अभिनेता विशाल करवालने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेत प्रेक्षकांना तो चांगलाच आवडला होता. त्याच्या गोड हसण्याने त्याने या व्यक्तिरेखेला मोहिनी घातली.

स्वप्नील जोशी- अभिनेता स्वप्नील जोशीही भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. रामानंद सागर यांच्या शो ‘श्री कृष्णा’मध्ये त्याने कान्हाची भूमिका साकारली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा