Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार खासगी कार्यक्रमांना आणि लग्नांना हजेरी लावण्यासाठी घेतात कोट्यवधी रुपये

काही दिवसांपूर्वी सलमान खानने नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावत धमाकेदार डान्स देखील केला. त्याच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. असे पहिल्यांदा नाही घडले की कोणत्या एका कलाकाराने एखाद्या इंडस्ट्रीबाहेरील लग्नाला हजेरी लावली आहे. अनेकदा कलाकार वेगवेगळ्या लग्नांना हजेरी लावत त्यांच्या डान्सचे सादरीकरण देखील करतात. मात्र कलाकार या लग्नांना किंवा खासगी समारंभांना जातात त्याबदल्यात बक्कळ पैसे घेतात. जाणून घेऊया कोणते कलाकार लग्नांना हजेरी लावण्यासाठी किती पैसे घेतात.

कॅटरिना खान :
कॅटरिना कैफ देखील अनेकदा लग्नांना किंवा खासगी कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. ती या कार्यक्रमांना जाण्यासाठी तब्बल ३.५ कोटी रुपये घेते.

शाहरुख खान :
शाहरुख खान देशात परदेशात अनेक खासगी कार्यक्रमांमध्ये जाताना आपण पाहिले आहे. यासाठी तो ३ कोटी रुपये घेतो.

अक्षय कुमार :
बॉलिवूडचा सर्वात व्यस्त अभिनेता म्हणून अक्षय ओळखला जातो. तो लग्नांना अथवा कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी २.५ कोटी रुपये घेतो.

प्रियांका चोप्रा :
बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाणारी प्रियांका अशा खासगी कार्यक्रमांसाठी २.५ कोटी रुपये घेते.

ऋतिक रोशन :
डान्सिंग किंग म्हणून ओळखला जाणारा ऋतिक लग्नांमध्ये हजेरी लावत डान्स करण्यासाठी २.५ कोटी रुपये घेतो.

रणबीर कपूर :
बर्फी बॉय म्हणून ओळख मिळवलेला हँडसम अभिनेता रणबीर कपूर देखील अनेकदा लग्नांमध्ये जात त्याचा परफॉर्मन्स देतो. यासाठी तो २ कोटी रुपये घेतो.

सलमान खान :
सलमान म्हणजे एक ब्रँड आहे. प्रत्येकालाच त्याने आपल्या लग्नात यावे असे वाटत असेल. जर तुम्हाला सलमान तुमच्या लग्नात पाहिजे असेल तर त्याला १ कोटी रुपये द्यावे लागतील.

रणवीर सिंग :
एनर्जेटिक स्टार म्हणून ओळख असलेला रणवीर सिंग आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. तो देखील अनेक खासगी कार्यक्रम गाजवताना दिसतो. त्यासाठी तो १ कोटी रुपये घेतो.

दीपिका पदुकोण :
बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण देखील अनेकदा विविध खासगी कार्यक्रमांमध्ये दिसते. त्यासाठी ती देखील १ कोटी घेते.

अनुष्का शर्मा :
बबली गर्ल म्हणून ओळख असलेली अनुष्का शर्मा देखील लग्नांमध्ये आणि खासगी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावण्यसाठी ८०/९० लाख चार्ज करते.

हेही वाचा :

मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात

कलाकारांनी चित्रपटांमध्ये वापरलेल्या ‘या’ वस्तूंचा झाला लाखोंमध्ये लिलाव

हे देखील वाचा