Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

KKK 12 | टेलिव्हिजनच्या सूना दाखवणार आपला डेरिंग अंदाज, स्पर्धकांची यादी आली समोर

प्रसिद्ध टेलिव्हिजन ऍडव्हेंचर रिऍलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता टीव्ही शो राहिला आहे. या शोच्या मागील सर्व सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशा परिस्थितीत आता चाहते याच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या शोच्या १२व्या सीझनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या शोच्या स्पर्धकांची नावे हळूहळू समोर येत आहेत. दरम्यान आता शोमध्ये सहभागी होणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) प्रसिद्ध शो ‘खतरों के खिलाडी’च्या १२व्या सीझनमध्ये टीव्हीची लाडकी सून स्पर्धक म्हणून दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत टीव्ही अभिनेत्री सृती झा (Sriti Jha) हिचे नावही जोडले गेले आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकचेही (Rubina Dilaik) नाव पुढे येत होते. पण आता बातम्यांवर विश्वास ठेवला, तर या शोमध्ये सृती झा आणि रुबिना दिलैक दोघी दिसणार आहेत. (these actors will be the contestants of khatron ke khiladi 12)

‘छोटी बहू’ या टीव्ही शोमधून आपली छाप पाडणारी रुबिना दिलैक ‘बिग बॉस १४’ची विजेती ठरली आहे. त्याचवेळी ‘कुमकुम भाग्य’ची प्रग्या म्हणून सृती झा प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ‘खतरों के खिलाडी सीझन १२’बद्दल बोलायचे झाले, तर यावेळी शोचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस शोचे शूटिंग सुरू होणार आहे.

याआधी शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत एरिका फर्नांडिस, प्रतीक सहजपाल, मुनव्वर फारुकी, शिवांगी जोशी, उमर रियाझ, पवित्रा पुनिया, चेतना पांडे आणि तुषार कालिया यांची नावे समोर आली आहेत. बातमीवर विश्वास ठेवला, तर सोशल मीडिया स्टार्स फैजल शेख म्हणजेच फैजू आणि जन्नत जुबेर रहमानी यांच्या नावाची चर्चाही जोर धरू लागली आहे.

‘खतरों के खिलाडी १२’चे शूटिंग पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, या शोच्या नव्या सीझनबद्दल निर्मात्यांनी अद्याप फारशी माहिती दिलेली नाही. ‘खतरों के खिलाडी’चा १२वा सीझन ‘डान्स दिवाने’च्या जागी येणार आहे, जो लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत हा रियॅलिटी शो जुलै २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा