Saturday, July 27, 2024

खरंच की काय! अजय देवगण कधीच पाहत नाही स्वतःचेच चित्रपट, पण का?

हिंदी भाषिक राज्यांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ वाढत आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असतील, तर हिंदीपेक्षा जास्त साऊथ चित्रपटांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रणवीर सिंगचा (Ranveer Singh) ‘८३’ आणि अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’, किंवा ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘जर्सी’ ही उदाहरणे आहेत.

काही दिवसांपूर्वी किच्चा सुदीपने (Kiccha Sudeepa) राष्ट्रभाषेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर, अजय देवगणने (Ajay Devgan) दणकून प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून अजय देवगण चांगलाच चर्चेत आहे. ट्विटरवरही तो ट्रेंड होत आहे. त्याचवेळी अजय देवगणचा ‘रनवे ३४’ हा चित्रपट शुक्रवारी (२९ एप्रिल) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अद्याप या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली, तरी अजय देवगणने स्वत: त्याच्या चित्रपटांबद्दल खुलासा केला आहे. (ajay devgn has not watched rrr and gangubai kathiawadi do not like watching my films)

एका मुलाखतीदरम्यान अजय देवगणने खुलासा केला की, तो त्याचे चित्रपट पाहत नाही. अजय देवगणने सांगितले की, त्याने त्याचे शेवटचे दोन चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ पाहिलेले नाहीत. ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’मध्ये अजय देवगणच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे चित्रपट अनुक्रमे २५ फेब्रुवारी आणि २४ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते.

अजय देवगणने ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये करीम लालाची भूमिका साकारली होती. ज्याने कामाठीपुरा येथे गंगूबाईला मदत करून, एक उदात्त कार्य केले. ‘आरआरआर’मध्ये अजय देवगणने राम चरणच्या (Ram Charan) वडिलांची भूमिका साकारली होती. अजय देवगणने सांगितले की, त्याला स्वतःचे चित्रपट पाहायला आवडत नाहीत. तो म्हणाला की, तो त्याच्या कामावर समाधानी आहे. परंतु त्याचा चित्रपट पाहिल्यानंतर काही महिन्यांनी त्याला वाटू लागते की, आपण आणखी चांगले काम करू शकलो असतो.

मुलाखतीदरम्यान अजय देवगणला विचारण्यात आले की, त्याने त्याची पत्नी काजोल (Kajol) आणि शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा लोकप्रिय चित्रपटही पाहिला का? उत्तरात अजय म्हणाला, “नाही, मी फारसे चित्रपट पाहत नाही.” पुढे तो म्हणाला की, “मी माझेही फारसे चित्रपट पाहिलेले नाहीत. कधी-कधी तुम्ही चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी इतके व्यस्त असता की, तुम्हाला तो बघता येत नाही आणि मग ते तसंच राहतं.”

आता अभिनेत्याच्या ‘रनवे ३४’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे रंजक ठरेल!

हेही वाचा

हे देखील वाचा