Wednesday, July 3, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ मोठ्या अभिनेत्रींना देखील करावा लागला यौन शोषणाचा सामना

आजच्या काळातील अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर अतिशय खुलेपणाने भाष्य करताना दिसतात. कोणत्याही विषयावर त्या शांत न बसता जगासमोर व्यक्त होतात. अभिनेत्रींचे किंबहुना कलाकारांचे यौन शोषण हा बॉलिवूडमधला अतिशय सामान्य विषय बनला आहे. अनेक कलाकार याला बळी पडतात. अगदी मोठ्यातल्या मोठ्या कलाकरांना देखील हा वाईट अनुभव आला आहे. नुकतेच सिक्रेड गेम्स स्टारर कुब्रा सैतने तिच्यासोबतही लहान असताना असेच काही झाल्याचा अनुभव शेअर केला आहे. आज या लेखातून अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.

कुब्रा सैत :
कुब्रा सैतने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे. कुब्रा सैतने लिहिलेल्या पुस्तकात खुलासा केला आहे की, वयाच्या १७ व्या वर्षी तिचे यौन शोषण झाले होते. तिने तिच्या पुस्तकात लिहिले, की ती बंगळुरूच्या एका रेस्टोरंटमध्ये जायची. त्या रेस्टोरंटचा मालक आणि त्याच्या भावासोबत तिची चांगली मैत्री देखील झाली. त्यानंतर त्यांनी तिचे यौन शोषण केले होते. अडीच वर्ष तिचे यौन शोषण झाले होते.

दीपिका पादुकोण :
दीपिका पदुकोणने देखील सांगितले होते की वयाच्या १४ व्या वर्षी एका माणसाने तिच्यासोबत चुकीची वर्तवणूक केली होती. एकदा तिचे वडील आणि बहीण पुढे जात होते आणि ती तिच्या आईसोबत मागे चालत होती. तेव्हा एका व्यक्तीने मागून तिची छेड काढली पुढे त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला आणि त्याला जोरदार थप्पड मारली होती.

बिपाशा बसु :
जेव्हा बिपाशा जॉनसोबत जिस्म सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी एका नाईट क्लबमध्ये गेली होती तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत चुकीची वर्तवणूक केली. त्या व्यक्तीने जेव्हा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा जॉनने त्याला शिक्षा दिली.

कल्कि कोचलिन :
कल्की कोचलीन ९ वर्षाची असताना तिचे यौन शोषण झाले होते. ती त्या व्यक्तीला ओळखत नव्हती. मात्र तिला भीती वाटायची की हे तिच्या आईला समजले तर? मी ही गोष्ट अनेक वर्ष लपवली ही माझी मोठी चूक होती.

सोनम कपूर :
सोनम कपूर देखील १३ व्या वर्षी यौन शोषणच शिकार झाली होती. मुंबईच्या गेयटी गॅलॅक्सी थियटरमध्ये तिच्यासोबत हे झाले होते. त्यानंतर ती खूप रडली होती.

स्वरा भास्कर :
सलमान खानच्या प्रेम रतन धन पायो च्या शुटिंगवेळी तिच्यासोबत राजकोटमध्ये छेडछाड झाली होती. तेव्हा अनुपम खेर यांनी तिला वाचवले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा