Saturday, June 15, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना वाढलेल्या वजनामुळे करावा लागला ट्रोलिंगचा सामना

मनोरंजन क्षेत्र नेहमीच सामान्य लोकांना भुरळ घालत असते. या क्षेत्रात असणारा पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर पाहून सर्वच लोकांना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होते. मात्र म्हणतात ना एका नाण्याच्या दोन बाजू असतात. अगदी असेच इथे देखील आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्राची चांगली बाजू बघतात तेव्हा ओघाने त्याची वाईट बाजू देखील येते. मात्र आपण मुद्दाम ती बघत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र सध्या सोशल मीडियाच्या जगात या आभासी जगाच्या अनेक वाईट बाजू खूपच सहज पद्धतीने समोर येतात. या ग्लॅमर जगात वावरताना कलाकारानं सतत चांगले दिसावेच लागते. उत्तम चेहरा, उत्तम फिगर सतत टिकवावी याला कोणतीही सूट नाही. खास करून अभिनेत्रींना हे जास्तच पाळावे लागते. अभिनेत्रींच्या लूकमधील छोट्यातला छोटा बदल देखील प्रेक्षक खूपच लवकर पकडतात. वाढत्या वयासोबतच किंवा इतर अनेक कारणांमुळे अभिनेत्रींच्या शरीरात होणारे बदल प्रेक्षक सहजासहजी स्वीकार करत नाही. मागील काही दिवसांपासून टेलिव्हिजन विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री असणाऱ्या रुबिना दिलायकला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कोरोना झाल्यानंतर रुबिनाचे वजन काही प्रमाणात वाढले होते. त्यामुळे तिला तिच्या वजनावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगला रुबिनाने सडेतोड उत्तर देखील दिले. फक्त रुबिनाच नाही याआधी अनेक अभिनेत्रींना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले गेले. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल.

हिना खान :
टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या हिनाने मागील काही दिवसांपूर्वी तिचा वर्कआऊट करतानाच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून तिला तिच्या वजनावरून ट्रोल केले जात होते.

रश्मी देसाई :
सतत चर्चेत असणारी अतिशय प्रसिद्ध अशा राशी देसाईला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रश्मी काही दिवसांपूर्वी सुट्ट्यासाठी गेली होती. तेव्हा तिने तिचा डिपनेक असलेल्या एका ड्रेसमधील फोटो शेअर केला त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले.

हिमांशी खुराणा :
पंजाबी अभिनेत्री असणाऱ्या हिमांशीने बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या स्वरूपात लाईमलाइट मिळवले. मात्र तिला देखील तिच्या वजनावरून ट्रोल केले गेले.

दिव्यांका त्रिपाठी :
दिव्यांका टीव्ही क्षेत्रातील सर्वात यशस्वी, लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला देखील तिच्या वाढलेल्या वजनावरून मोठ्या स्वरूपात ट्रोल केले गेले.

अशिका भाटिया :
अभिनेत्री अशिका भाटियाला तिच्या वजनावरून ट्रोल केले हते. मात्र अशिकाने आता तिचे वजन कमी करत तिचा नवीन लूक फ्लॉन्ट केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा