शिवजयंती विशेष: शिवाजी महाराजांच्या भूमिका अजरामर करणारे ५ कलाकार तुम्हाला माहित आहेत काय?


सर्व समाज घटकांना एकत्रित आणत, मावळ्यांच्या मदतीने रयतेचे राज्य उभारून अवघ्या जगाचे प्रेरणास्रोत ठरलेल्या शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रात झाला होता. रयतेचा राजा म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आणि महती आपण अनेक कादंबऱ्या, कथा, नाटक, मालिका आणि चित्रपटाद्वारे नेहमीच पाहत आलो आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण काही अशा चेहऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी महाराजांची भूमिका केली आहे आणि आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना भारावून टाकले आहे.

शरद केळकर
अभिनेता शरद केळकर यांची शिवाजी महाराजांची मोठ्या पडद्यावरची भूमिका चांगलीच गाजली. ओम राऊत यांच्या ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात शरद केळकर यांनी राजे शिवाजींची भूमिका केली होती. या चित्रपटात अजय देवगण तानाजीच्या मुख्य भूमिकेत होता, तर सैफ अली खान याने उदयभानसिंग राठोडची भूमिका साकारली होती. अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. आपल्या भूमिकेची योग्य अशी छाप जनतेच्या मनावर पाडण्यात शरद केळकर यशस्वी ठरला होता.

अमोल कोल्हे
अभिनेता अमोल कोल्हे यांनी अनेकदा छोट्या आणि मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिव शिव छत्रपती’ ही त्यांची पहिली शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मालिका होती. या शिवाय त्यांनी ‘राजमाता जिजाऊ’ मध्ये देखील महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट त्यांच्या आईवर आधारित होता.

मराठी व्यतिरिक्त ‘वीर शिवाजी’ या हिंदी मालिकेत देखील त्यांनी आपल्या उत्कृष्ट अशा अभिनयाची छाप जनतेच्या मनावर सोडण्यास ते यशस्वी ठरले होते.

महेश मांजरेकर
सन २००९ साली प्रदर्शित झालेला ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा महेश मांजरेकर यांचा पहिला चित्रपट होता. ह्या चित्रपटात त्यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीच्या काल्पनिक मित्राची भूमिका साकारली हाती. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले होते. तर संजय छाब्रिया आणि अश्वमी मांजरेकर यांनी ह्यांनी निर्मिती केली होती.

नसीरुद्दीन शाह
सन १९८८ साली ‘भारत एक खोज’ या मालिकेत नसिरुद्दीन शाह हे शिवाजी महाराजांची भूमिकेत दिसले होते. सोबतच या इरफान खान आणि ओम पुरी देखील या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसले होते. ‘भारत एक खोज’ हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित भारतीय ऐतिहासिक नाटक आहे.

पारस आरोडा
कलर्स वाहिनीवरील ‘वीर शिवाजी’ ह्या मालिकेत पारस आरोडा हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसला होता. या मालिकेत त्याने शिवाजी महाराजांच्या बालपणापाची भूमिका साकारली होती.
त्याच्या या अभियानानंतर तो खूपच प्रसिद्ध झाला होता, आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्याच्या या भूमिकेसाठी चांगली पसंती दर्शविली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.