सैफ अली खान हा एक बॉलिवूड सुपरस्टार आहे. त्याने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. तसेच त्याच्या अभिनयातुन त्याने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आता त्याच्या एका चित्रपटामुळे तो आता चर्चेत आला आहे. ‘कर्तव्य’ हा चित्रपट आता येणार आहे. आणि ‘कर्तव्य’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. नुकतेच अभिनेता शाहरुख खानने इंस्टाग्रामवर सांगितले की, सैफचा चित्रपट 15 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
ह्या चित्रपटाची बातमी पोस्ट करुन त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, “कर्तव्य पार पाडण्याच्या या चक्रव्यूहात, प्रत्येक निर्णय एक परीक्षा असेल. ‘कर्तव्य’ (kartvya)पाहा, 15 रोजी, फक्त नेटफ्लिक्सवर.” शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली निर्मित ‘कर्तव्य’मध्ये रसिका दुगल, संजय मिश्रा, झाकीर हुसेन, मनीष चौधरी आणि सौरभ द्विवेदी यांच्याही भूमिका आहेत.
एका प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘कर्तव्य’ हा चित्रपट शाहरुख खानने साकारलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा सांगतो, तर या चित्रपटात सैफ अली खान, शाहरुख खान, असल्याचे दिसत आहे. तर या चित्रपटाचे पुलकितने दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘कर्तव्य’ हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित आहे. सैफ अली खानचा दमदार अभिनय आणि उत्कृष्ट कलाकारांची साथ असल्याचे दिसत आहे. खुप दिवसानंतर सैफ अली खान आता एका दमदार भुमिकेत दिसणार आहे.










