सामान्यतः मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुख्य तीन गरजा आहेत. मात्र सध्याच्या सोशल मीडियाचा लोकांवरील पगडा बघता यात सोशल मीडिया ही चौथी गरज अप्रत्यक्षरीत्या जोडली गेलीच आहे. या सोशल मीडियाने संपूर्ण जगाला अतिशय जवळ आणत जोडून ठेवले आहे. या डिजिटल युगाने आपल्या दैनंदिन आयुष्याला अतिशय सुखद करत आपल्याला आनंद तर दिलाच आहे, सोबतच दुरून का असेना नाती जोडलेली आहे याचे समाधानही दिले आहे. मात्र आपल्याकडे अशी म्हण आहे की, नाण्याला दोन्ही बाजू असतात. अगदी असेच या सोसहल मीडियाचा, डिजिटल युगाचा जेवढा फायदा आहे, तेवढाच तोटा आणि धोका देखील आहे. अगदी सामान्यांपासून ते खास व्यक्तींपर्यंत सर्वांनाच याचा अनुभव येताना दिसतो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि त्यांचे फॅन्स एकमेकांशी अगदी एका क्लिकवर जोडले जातात. मात्र अनेकदा कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच जॉन अब्राहमचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आणि त्याच्या सर्वच पोस्ट डिलीट झाल्या. मात्र हे पहिल्यांदाच झाले असे नाही. ग्लॅमर जगातील अनेक व्यक्तींचे सोशल मीडिया अकाऊंट याआधी हॅक झाले आहे. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे.
अनुपम खेर :
बॉलिवूडमधील दिग्गज आणि प्रभावी अभिनेते अनुपम खेर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. जेव्हा अनुपम खेर परदेशात होते तेव्हा त्यांचे अकाऊंट हॅक झाले. त्यांच्या एका मित्राने त्यांना याची माहिती दिली आणि त्यानंतर अनुपम यांनी कारवाई केली.
श्रुती हसन :
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या श्रुती हसनचे २०१३ साली ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यानंतर तिने ट्विट करत ही माहिती दिली होती.
अभिषेक बच्चन :
अभिषेक बच्चनचे देखील ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. तुर्कीमधील एका व्यक्तीने त्याचे अकाऊंट हॅक करत काही पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. त्यानंतर त्याने त्याचे ट्विटर अकाऊंट डिलीट केले.
अमिताभ बच्चन :
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एका पॉर्न साईटला फॉलो करण्यात आले होते. अमिताभ यांनी त्यांचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती ट्विट करून दिली.
करण जोहर :
करण जोहरच्या देखील ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. त्यानंतर त्यावरून अनेकांना मेसेजस केले जात होते. करणला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले, तेव्हा त्याला त्याचे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले.
हेही वाचा-