बॉलिवूडमध्ये रोज नवनवीन नाते तयार होतात आणि तुटतात देखील. ब्रेकअप, घटस्फोट बॉलिवूड कलाकारांसाठी काही नवीन नाही. आपल्या बॉलिवूडमधेच एक सिनेमा आहे ज्यात एक संवाद आहे, ‘हम एक बार जिते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एकही बार होती हैं, और प्यार भी एकही बार होता हैं.’ हा संवाद अजिबातच काही अपवाद वगळता इतर कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात लागू होत नाही. कारण असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी एकापेक्षा अधिक लग्न केले आहेत. असे जवळपास सर्वच कलाकार सर्वांना माहित आहे. पण असेही अनेक कलाकार किंवा कलाकारांच्या जोड्या आहेत, जे वेगळे तर झाले मात्र त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. आज आपण अशाच कलाकारांची नावे पाहणार आहोत.
रणधीर कपूर आणि बबिता
रणधीर कपूर आणि बबिता यांनी १९७१ साली लग्न केले. पण लग्नानंतर बबिता यांना चित्रपटांमध्ये काम करण्यास मज्जाव करण्यात आला. इथूनच त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यात रणधीर यांचा संतापी स्वभाव आणि त्यांना जडलेले दारूचे व्यसन हे देखील त्यांचे नाते तुटण्यास पूरक ठरले. १९८८ नंतर या दोघांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. वेगळे राहूनही ते बऱ्याचदा कार्यक्रमांना सोबत हजेरी लावताना दिसतात.
गुलजार आणि राखी
गुलजार आणि राखी यांनी १९७३ साली लग्न केले. राखी यांचे गुलजार साहेबांसोबत दुसरे लग्न होते. या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होते. मात्र गुलजार साहेबांनी ‘मौसम’ सिनेमासाठी राखी यांना न घेता शर्मिला टागोर यांना घेतली. इथेच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया
सुपरस्टार राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केले, तेव्हा डिंपल इंडस्ट्रीमध्ये खूपच नवीन होत्या. त्यांच्यात वयाचे अंतरही खूप होते. जसा काळ पुढे गेला तसे त्यांच्या वैचारिक मतभेद सुरु झाले, आणि त्यावरून वाद होऊ लागले. १९८२ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ते जरी वेगळे राहत असले तरी त्यांनी घटस्फोट घेतला नाही. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवस डिंपल त्याच्यासोबत होत्या.
महिमा चौधरी आणि बॉबी मुखर्जी
परदेस फेम महिमा चौधरीने २००७ साली आर्किटेक्ट असणाऱ्या बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. बॉबीचे हे दुसरे लग्न होते. काही वर्ष सर्व नीट होते, मात्र २०११ साली ते वेगळे झाल्याच्या बातम्या यायला लागल्या. याच वर्षी त्यांनी ते वेगळे झाल्याचे जाहीर केले. मात्र अजूनही त्यांनी घटस्फोट घेतला नाही.
अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी
अभिनेत्री संगीत बिजलानी आणि क्रिकेटर अझरुद्दीन यांनी १९९६ साली लग्न केले त्यानंतर जवळपास १४ वर्षसोबत होते. मात्र पुढे यांच्यात सर्व आलबेल नसल्याने त्यांनी २०१० साली वेगळे होण्याचे ठरवले. मात्र अजूनही त्यांनी घटस्फोट घेतला नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ