Friday, July 5, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी मुंबईला ठोकला राम रमा , विदेशात थाटलाय…

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या अभिनेत्रींचे चित्रट पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहायचे पण आता मात्र, या अभिनेत्रीने मुंबतईला सोडून विदेशामध्ये संसार थाटलाय. आज आपण अशाच अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी इंडस्ट्रीला सोडून परदेशात आपले वेगळेच जग बनवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रिती झिंटा
लोकप्रिय अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) बॉलिवूडमध्ये डिंपल गर्ल म्हणून ओळखली जायची. तिने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये आपली छाप सोडली आहे. प्रितीने अनेक काळ चित्रपटामध्ये काम केले होते, यानंतर तिने जीन गुडइनफ याच्या सोबत लग्न केले आणि पतीसोबत अमेरिकामध्येच स्थाई झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by RambhaIndrakumar???? (@rambhaindran_)

रंभा इंद्र कुमार
अभिनेत्री रंभा इंद्र कुमार (Rambha Indra Kumar) हिने बॉलिवूडच नाहीतर तेलुगू, कन्नड, बंगाली, आणि हॉलिवूडमध्येही काम केले आहे. तिने अनेक चित्रपटामध्ये आपली छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात झाला होती त्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली होती. तिने गोवींदा आणि सलमानसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. एनआरआय उद्येगपती इंद्र कुमारसोबत लग्न केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला आणि कॅनडामध्ये नेहमीसाठी स्थायी झाली.

मिनाक्षी शेषाद्रीअभिनेत्री मिनक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) हिने 80-90च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले होते. दामिनी, आदमी खिलोना है, घर हो तो एसा, सारख्या गजणाऱ्या चित्रपटचामध्ये काम केल्यानंतर तिने हरिश मसूर सोबत लग्न केले आणि अमेरिकामध्ये आपल्या कुटुंबीयासोबत स्थायी झाली. माध्यमातील वुत्तानुसार अभिनेत्री टेक्सासच्या प्लानो शहरामध्ये राहत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंका चोप्रा
या लिस्टमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) हिचे नाव देखिल यादीमध्ये आहे. प्रियंकाने आपल्या करिअरमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले असून तिला हॉलिवूड चित्रपटामध्ये देखिल काम करण्याची संधी मिळाली आणि तिने संधीचे सोने केले असून अमेरिकामध्येच स्थायी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने अमेरिकन सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केल्यानंतर ती जास्त अमेरिकामध्ये राहत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा