Thursday, March 28, 2024

ऋतिक रोशन-यामी गौतमच्या ‘काबिल’मुळे रडली होती प्रिती झिंटा, चीनमध्येही होती चर्चा

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि यामी गौतम यांचा २५ जानेवारी २०१७ मध्ये ‘काबिल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटात ऋतिक-यामी व्यतिरिक्त रोहित रॉय, रोनित रॉय, उर्वशी रौतेला देखील होते. हा चित्रपट चीनमध्येही प्रदर्शित झाला होता, जिथे ऋतिकला पाहून चिनी प्रेक्षक वेडे झाले होते. चीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चला तर मग ‘काबिल’ला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या चित्रपटाशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया.

ऋतिक रोशनचा ‘काबिल’ चीनमध्येही झाला होता हिट

ऋतिक (hrithik roshan) हा बॉलिवूडचा प्रचंड हँडसम अभिनेता मानला जातो. जेव्हा त्याचा ‘काबिल’ हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या चिनी चाहत्यांनी त्याला खास नाव दिले. भारतात ‘ग्रीक गॉड’ म्हणून प्रसिद्ध आहे, पण चिनी चाहत्यांनी ऋतिकला मंदारिन भाषेत ‘दा शुआई’ म्हणायला सुरुवात केली. याचा अर्थ देखणा, सुंदर, हुशार. माध्यमांतील वृत्तानुसार, ऋतिकचे चायनीज फॅन्स त्याच्या इतके वेडे झाले होते की, त्यांनी मेल्स लिहायला सुरुवात केली. ऋतिकने एवढा जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता की, या चित्रपटाचे चाहते चीनमध्येच नव्हे, तर बॉलिवूडमध्येही वेडे झाले होते.

प्रिती झिंटा रडली

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि ऋतिक रोशन हे चांगले मित्र मानले जातात. त्यांचा ‘कोई मिल गया’ हा चित्रपट आजही चाहत्यांना आठवतो. पण ‘काबिल’मध्ये यामी गौतमसोबत ऋतिकला पाहून प्रीतीच्या डोळ्यात पाणी आले. याचा खुलासा स्वत: प्रितीने ३ फेब्रुवारी २०१७ रोजी केला होता.

‘काबिल’मध्ये ऋतिक-यामीचा दमदार अभिनय

जेव्हा ५ वर्षांपूर्वी ‘काबिल’ प्रदर्शित झाला तेव्हा प्रीती झिंटाने या चित्रपटाबद्दल चाहत्यांशी लाइव्ह चॅटिंगमध्ये सांगितले होते की, ऋतिक रोशन आणि यामी गौतमने तिला रडवले होते. असे झाले की, एका चाहत्याने प्रीतीला विचारले की, तिने ‘काबिल’ पाहिला आहे का? यावर प्रितीने उत्तर दिले की, “काबिल आणि ऋतिक दोघेही आवडले होते. मला वाटतं ‘कोई मिल गया’ नंतरचा हा ऋतिकचा सर्वोत्तम अभिनय होता. त्याने आणि यामीने मला रडवले.”

यामी-ऋतिकने अंध जोडप्याची साकारली होती भूमिका

‘काबिल’ चित्रपटात ऋतिक (रोहित भटनागर) आणि यामी (सु भटनागर) यांनी अंध पती-पत्नीची भूमिका साकारली होती. रोहित भटनागरच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्या या चित्रपटात रोनित रॉय आणि रोहित रॉय खलनायक होते. या चित्रपटात पत्नी बनलेल्या यामीने आत्महत्या केली होती. दुःखी ऋतिक बदला घेतो आणि त्या दोघांना मारतो आणि ते पाहू शकत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडत नाही. या चित्रपटात ऋतिक आणि यामीने जबरदस्त अभिनय केला आहे.

हेही वाचा :

‘आय लव्ह माय इंडिया,’ म्हणत बिग बॉस फेम सोनाली पाटीलने दिल्या प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा

गणराज्य दिन २०२२ : मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवणारी ही गाणी ऐकताच तुम्हीही बोलाल, ‘भारत माता की…जय!’

प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

हे देखील वाचा