Monday, October 2, 2023

नादच खुळा! अल्लू अर्जुनपासून ते सूर्यापर्यंत १०० कोटींच्या क्लबचे बादशाह आहेत ‘हे’ साऊथ सुपरस्टार्स

बॉलिवूडमध्ये असे अनेकदा ऐकायला मिळते की, कोणता ना कोणता चित्रपट हा १०० कोटी क्लबचा भाग बनतो. हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खान, शाहरुख खानसारखे कलाकार आहेत, ज्यांनी १०० कोटी क्लबमध्ये नेहमी राज्य केले आहे. अशाच प्रकारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी हा आकडा पार केला आहे. या यादीमध्ये एकूण १० अभिनेते आहेत. याच संदर्भात आज या लेखामधून आपण जाणून घेणार आहोत.

१. रजनीकांत
या यादीत पहिले नाव घ्यायचे झाले, तर ते दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचेच घ्यावे लागेल. त्यांना ‘दक्षिण सिनेमाचा देव’ म्हटले जाते. रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांचे एकूण ८ चित्रपट आहेत, जे १०० कोटींच्या यादीत समाविष्ट आहेत. ज्यामध्ये ‘शिवाजी’, ‘लिंगा’, ‘काला’, ‘दरबार’, ‘पेट्टा’, ‘कबाली’, ‘रोबोट’ आणि ‘२.०’ या चित्रपटांचा समावेश आहे.

२. अल्लू अर्जुन
यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुनचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ६ चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये ‘डीजे’, ‘रेस गुरुम’, ‘आला वैकुंठपुरमलो’, ‘सराईनोडू’, ‘जुयाली’ आणि ‘ना पिरू सूर्या ना इलू इंडिया’ या चित्रपटांचा समावेश आहे.

३. महेश बाबू
अभिनेता महेश बाबूच्या एकूण ६ चित्रपटांचा १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश आहे. जर त्याच्या १०० कोटी क्लब चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात ‘दोकाडू’, ‘श्रीमंथडु’, ‘सरिलेरू’, ‘महर्षी’, ‘निकेवरू’ आणि ‘स्पायडर’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

४. अजित कुमार
या यादीत महेश बाबूनंतर अभिनेते अजित कुमार यांचे नाव येते. त्यांच्या ६ चित्रपटांचा १०० कोटीं क्लबमध्ये समावेश आहे. यामध्ये ‘आरंभ’, ‘नीरोकोंडा पर्वी’, ‘विवेगम’, ‘विश्वसम’, ‘वीरम’ आणि ‘वेघलम’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. अजित यांना सिनेमा जगतात ‘थाला अजित’ म्हणूनही ओळखले जाते.

५. सुर्या
अभिनेता सुर्याने एकूण ३ चित्रपट केले आहेत, जे १०० कोटींच्या क्लबमध्ये आहेत. त्यामध्ये ‘सिंघम २’, ‘सिंघम ३’ आणि ‘२४’ या चित्रपटांचा समावेश आहेत.

६. ज्युनिअर एनटीआर
साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआरचे एकूण ३ चित्रपट आहेत, जे १०० कोटीच्या क्लबमध्ये सामील आहेत. यामध्ये ‘जय लव कुसा’, ‘अरविंद समेधा वीरा राघव’ आणि ‘जनता गॅरेज’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

७. प्रभास
‘बाहुबली’ स्टारर प्रभासने एकूण ३ चित्रपट केले आहेत, जे १०० कोटींच्या क्लबमधील आहेत. यात त्याच्या ‘बाहुबली’च्या दोन्ही मालिका आणि ‘साहो’ चित्रपटाचा समावेश आहे.

८. राम चरण
दाक्षिणात्य सिनेमाचा ऍक्शन स्टार राम चरणने एकूण २ चित्रपट केले आहेत, जे १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील आहेत. यामध्ये त्याच्या सुप्रसिद्ध चित्रपट ‘मगधीरा’ आणि ‘रंगस्थल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.

९. विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडाचा चित्रपट देखील १०० कोटी क्लबमध्ये सामील आहे. यामध्ये ‘गीता गोविंदम’ या साऊथ चित्रपटाचा समावेश आहे

१०. यश
अभिनेता यशच्या चित्रपटाचा या यादीत समावेश आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट ‘केजीएफ’ चा समावेश आहे. त्याच्या या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला.

अधिक वाचा- 
बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत

हे देखील वाचा