Tuesday, July 9, 2024

पोल डान्समध्ये ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत निपुण, बोल्ड मुव्हजने एकमेकांना देताना कडवी टक्कर

मनोरंजनविश्वात काम करण्यासाठी कलाकरांना खासकरून अभिनेत्रींना डान्स येणे खूपच महत्वाचे असते. किंबहुना ही एक अटच ठेवली जाते. आजच्या काळातील सर्वच अभिनेत्रींना डान्स येतच असतो. डान्स या कलेसोबतच फिटनेसचा उत्तम मार्ग देखील समजला जातो. डान्सचे अनेक प्रकार आणि स्टाईल आजच्या काळात प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. याच डान्स प्रकारातला एक डान्स म्हणजे पोल डान्स. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक अभिनेत्री आहेत, ज्या हा डान्स करत स्वतःला फिट ठेवतात. हा डान्स करण्यासाठी तुम्हाला यात अतिशय उत्तम असावे लागते. आज आपण या लेखातून अशा टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्या पोल डान्समध्ये अतिशय निपुण आहे.

निया शर्मा (Nia Sharma)
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय बोल्ड आणि मादक अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या निया शर्माने तिच्या हिट मालिकांमधून आणि बोल्ड फोटोजमधून अमाप लोकप्रियता मिळवली आहे. निया शर्मा देखील पोल डान्समध्ये निपुण आहे. ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या या पोल डान्सचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच तिच्या या कलेबद्दल कौतुक वाटेल.

आशका गोराडिया (Aashka Goradia)
टीव्ही क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय खलनायिका असणाऱ्या आशकाने तिच्या नकारात्मक भूमिकांनी सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आशका फिटनेसच्या बाबतीत किती सजग आहे, हे तर सर्वश्रुत आहे. आशका नेहमीच तिच्या योगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. योगासोबतच आशका पोल डान्समध्ये देखील निपुण आहे. ती अनेकदा तिच्या पोल डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. अभिनय सोडलेल्या आशका फिटनेस मात्र सोडलेला नाही.

नेहा पेंडसे (neha pendse)
मराठीसोबतच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणून नेहा ओळखली जाते. नेहा तिच्या अभिनयाइतकीच तिच्या फिटनेस बाबतीत ओळखली जाते. नेहा देखील तिचा फिटनेस राखण्यासाठी पोल डान्सची मदत घेते. या डान्सचे अनेक व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

शमा सिकंदर (shama sikandar)
शमा सिकंदर हे मालिकाविश्वातील मोठे नाव आज जरी शमा मालिकांमध्ये कमी दिसत असली तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. शमा अनेकदा तिच्या पोल डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी शॉर्ट ड्रेसमध्ये तर कधी बिकिनीमध्ये ती पोल डान्स करते.

स्माइली सूरी (Smilly Suri)
कलयुग सिनेमातील अभिनेत्री स्माइली जरी आज चित्रपटांमधून गायब असली तरी ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. याच प्लॅटफॉर्मवरून तिने अनेकदा तिचे पोल डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा