Tuesday, March 5, 2024

खरे की काय? गुपचूप लग्न केल्यानंतर ‘हा’ अभिनेता झाला बाबा? दोन महिन्याचे झाले बाळ

टीव्ही अभिनेता विवियन डिसेना अचानक मीडियामध्ये लाइमलाईट्मधे आला आहे. त्याने मीडिया आणि त्याच्या फॅन्सपासून लपवून लग्न केल्यापासून विवियन सतत मीडियामध्ये येत आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आधी विवियनने अतिशय गुप्त पद्धतीने नौरान एलीसोबत लग्न केल्याची बातमी आली होती. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार विवियन डिसेना बाबा झाला आहे. विवियन आणि नौरान आईवडील झाले असून त्यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. एका माहितीनुसार नौरान नेहमीच त्यांच्या मुलीचे फोटो त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करत असते. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने देखील त्यांच्या मुलीचा फोटो पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivian Dsena (@viviandsena)

विवियन डिसेनासोबत काम केलेल्या एका कलाकाराने देखील या बातमीला सत्य सांगितले आहे. हे देखील सांगितले की, त्या व्यक्तीचे नाव गुप्त राहिले पाहिजे. त्या व्यक्तीने हे देखील सांगितले की, अभिनेत्याला त्याच्या मुलीबद्दल कोणालाही कळू द्यायचे नाही. यासाठी विवियनने कोणालाही मुलीबद्दल न सांगण्याचे ठरवले आहे. या निर्णयामध्ये त्याची पत्नी नौरानदेखील त्याच्यासोबत आहे.

दरम्यान त्याच्या मुलीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. विवियन डिसेनाचे हे दुसरे लग्न असून, त्याने पहिले लग्न अभिनेत्री वाहबिज दोराबजीसोबत केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न अर्ध्यातच संपुष्टात आले. २०२१ साली त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतला.

तत्पूर्वी लवकरच विवियन डिसेना त्याच्या एका नवीन शोसोबत टीव्हीवर पुनरागमन करत आहे. एका माहितीनुसार तो लवकरच एका शो मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे. हा शो एका सामाजिक मुद्द्यावर आधारित असणार आहे. एप्रिलमध्ये शो येऊ शकतो असे सांगितले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी ‘ म्हणत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसाठी तुरुंगातून लिहिले अजून एक प्रेमपत्र
‘ये काली काली आँखें…’ दीपिकाचा लेटेस्ट फाेटाेशूट पाहिलात का?

हे देखील वाचा