बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवले दिग्गज अभिनेते म्हणजे मुकेश ऋषी. बहुतकरून आपल्या खलनायकी भूमिकांमधून त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. मुकेश ऋषी हे नाव उच्चारले की सर्वात आधी डोळ्यात समोर येतो तो ‘सरफरोश’. १९९३ साली त्यांनी अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अतिशय उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुकेश हे आज बॉलिवूडमध्ये कमी आणि टॉलिवूडमध्ये जास्त दिसत असले तरी ते उत्तम काम करत आहे. मात्र अचानक मुकेश ऋषी चर्चेत येण्याचे खास कारण आहे.
मुकेश यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे की, त्यांचे बॉलिवूडमध्ये कोणतेच मित्र नाहीत. मुकेश यांनी त्यांच्या करियरमध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, सनी देओल, आमिर खान आदी अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांचे इथे कोणीच कलाकार मित्र नाहीत. कामाच्या ठिकाणी आणि येथी वेळेस त्यांच्या मनात आपल्या सहकालाकरांबद्दल आणि वरिष्ठांबद्दल कायमच आदर असल्याचे मुलाखतीमध्ये सांगितले.

एका मुलाखतीमध्ये मुकेश यांना विचारण्यात आले की, चित्रपटांमध्ये एवढे काम करूनही त्यांनी मित्र का नाही बनवले. यावर त्यांनी उत्तर देताना म्हटले, “मी खऱ्या मित्रांबद्दल नाही बोलणार कारण मी त्या पातळीवर नाही जाऊ इच्छित. मी त्या पातळीपर्यंत पोहचू शकलेलो नाही, जिथे मी माझे जवळचे मित्र बनवू शकेल. मी कधीही काम झाल्यानंतर माझ्या सहकलाकारांसोबत फिरायला जाण्याचा प्रयत्न केले नाही. याउलट मी घरी जाऊन माझे सामान्य जीवन जागायचो. मी कोणत्याही लॉबीमध्ये नाही.”
पुढे मुकेश यांना त्यांच्या बॉलिवूडमधील कमबॅक बद्दल विचारणा झाली. यावर ते म्हणाले, “मी जशा भूमिका केल्या तशा आता मिळवणे अवघड आहे. आजही लोकं मला खलनायक म्हणून बघू इच्छिता. मात्र यापेक्षा मी अधिक काहीच बोलू शकत नाही.” मुकेश ऋषी यांनी सूर्यवंशम सिनेमात साकारलेली केवडा ठाकूर ही भूमिका तुफान गाजली होती.
अधिक वाचा-
–बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
–नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत