Tuesday, April 23, 2024

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते उपचारासाठी रुग्णालयात भरती, गंभीर आजाराशी देत आहे झुंज

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील दिगज्ज आणि प्रतिभावान अभिनेते सरथ बाबू यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. २३ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आणि त्यांना गाचीबोवली येथील एआईजी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहे.

मीडिया मधील माहितीनुसार सरथ यांची प्रकृती मागील काही काळापासून खराबच आहे. यातच त्यांना २० एप्रिल रोजी बंगळुरू इथून हैद्राबादला नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एआयजीरुग्णालयात भरती केले गेले. सरथ यांना मल्टी ऑर्गन डॅमेजची समस्या झाली असून यावर उपचार चालू आहे. सरथ यांना सेप्सिस हा आजार झाला असून त्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहे. या आजारात व्यक्तीच्या किडनी, फुप्फुस, लिव्हर आणि शरीराच्या इतर अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो. वेळेवर या जोरावर उपचार केला नाही तर बाधित व्यक्तीचे मल्टी ऑर्गन फेलियर होण्याची संभावना असते. मधल्या काही काळापासून सरथ यांना दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

दरम्यान सरथ बाबू यांचे खरे नाव सत्यम बाबू दीक्षितुलु असे आहे. त्यांनी १९७३ साली त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. सरथ यांना त्यांच्या उत्तम आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाते. त्यांनी अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून, मुख्यतः त्यांनी तामिळ आणि तेलगू भाषेत काम केले आहे. सोबतच काही मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आता देवाकडे प्रार्थना केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…

हे देखील वाचा