बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्यापेक्षा एक दिग्दर्शक म्हणून आपली छाप पाडलेले अभिनेते म्हणजेच राकेश रोशन. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी अगदीच कमी चित्रपट केले आहेत. पण जे केलेत ते मात्र एका पेक्षा एक सुपरहिट आहेत. बॉलिवूडमध्ये सुपरहिरोचा चित्रपट त्यांनी सर्वात आधी केला आहे. त्यांनतर बॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे अनेक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न झाला, पण ते सगळे चित्रपट फ्लॉप झाले. राकेश रोशन यांच्या चित्रपटांपैकी ‘क्रिश’ या चित्रपटाची सीरिज खूप चर्चेत होती. क्रिश चित्रपटातील राकेश रोशन यांचा मुलगा आणि सुपरस्टार ऋतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. पण ही गोष्ट खूप कमी चाहत्यांना माहित असेल की, या चित्रपटात प्रियांका चोप्राच्या आधी दुसऱ्या एका अभिनेत्रीला निवडले होते.
क्रिश या चित्रपटासाठी सुरुवातीला अमृता राव या अभिनेत्रीला निवडले होते. परंतु नंतर तिच्या जागी प्रियांका चोप्राला घेण्यात आले. या गोष्टीचा खुलासा स्वतः अमृता रावने तिच्या एका मुलाखतीत केला होता.
अमृताने सांगितले होते की, “ऋतिक आणि माझे एक फोटोशूट केले होते. पण त्या दरम्यान आमच्यामध्ये ताळमेळ दिसला नाही. मी ऋतिक समोर खूपच लहान दिसत होते. क्रिश हा चित्रपट न करण्यामागे हेच आणि एवढेच कारण होते. बाकी माझ्या मनात दुसरे काहीच नव्हते. कोणती गोष्ट आपल्याला मिळेल किंवा मिळणार नाही या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात.”
क्रिश या चित्रपटाच्या दोन्ही सीरिजमध्ये ऋतिक रोशन सोबत प्रियांका चोप्रा होती. पहिल्या भागात नसीरुद्दीन शाह खलनायक होते, तर दुसऱ्या भगात विवेक ओबेरॉय हा खलनायक होता. यानंतर प्रेक्षक ‘क्रिश’च्या पुढच्या भागाची देखील वाट पाहत आहेत. राकेश रोशन या प्रोजेक्टवर काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अमृता रावने 2002 मध्ये ‘अब के बरस’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनतर 2003 मध्ये ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. त्यांनतर तिने ‘मस्ती’, ‘मैं हू ना’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ आणि ‘विवाह’ या चित्रपटात काम केले. विवाह या चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण आहे प्रियांका चोप्रा; तिच्याच घरात भाड्याने राहते जॅकलिन फर्नांडिस
-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा