तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण आहे प्रियांका चोप्रा; तिच्याच घरात भाड्याने राहते जॅकलिन फर्नांडिस

priyanka chopra nick jonas total net worth jacqueline fernandez stayed on rent


अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जगातील प्रसिद्ध विवाहित जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. दोघेही आपापल्या कलागुण आणि क्षेत्रात पारंगत आहेत, यामुळे त्यांच्या मालमत्तेतही लक्षणीय वाढ होत आहे. प्रियांका चोप्रा आता जागतिक अभिनेत्री म्हणून, परदेशातही तिच्या यशाने धमाल करत आहे, तर निक जोनास पूर्वीपासूनच एक प्रसिद्ध गायक आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, प्रियांका आणि निक यांची एकूण मालमत्ता ७३४ कोटी रुपये आहे. फोर्ब्स इंडिया २०१९ च्या सेलिब्रिटी यादीमध्ये प्रियांका १४ व्या स्थानावर होती. त्यावेळी तिची वार्षिक कमाई २३.४ कोटी रुपये होती. २०१९ मध्ये, प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ आणि ‘इज नॉट इट रोमँटिक’ या दोन चित्रपटांमध्ये दिसली होती. यानंतर तिच्या संपत्तीत आणखी वाढ झाली.

मात्र, सन २०२० मध्ये प्रियांकाचा हा जलवा टिकू शकला नाही. संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले. यामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडसह सर्व चित्रपटसृष्टींना खूप नुकसान सहन करावे लागले. कलाकारांचे देखील मोठे नुकसान झाले. पण मार्च २०२१ मध्ये प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचे एक भारतीय रेस्टॉरंट उघडले.

प्रियांकाच्या हॉलिवूड कनेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१५ मध्ये ‘बेवॉच’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘क्वांटिको’मध्ये दिसली होती. याच्या प्रत्येक एपिसोडसाठी प्रियांका तीन कोटी रुपये फी घेत असे. यावेळी सुद्धा अभिनेत्री हॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे.

याशिवाय प्रियांका एका स्टेज शोसाठी चार ते पाच कोटी रुपये घेते. अनेक बड्या ब्रँडची ती ब्रँड एंबेसेडर आहे. हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर, प्रियांका बॉलिवूडच्या क्वचितच चित्रपटांमध्ये दिसली आहे. असे असूनही, तिची गणना इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. प्रियांका बॉलिवूड चित्रपटांसाठी साधारणत: १२ कोटी रुपये मानधन घेते.

प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामवरून देखील बरेच पैसे कमावते. २०१९ मध्ये उघड झाले की, प्रियांका ज्या जाहिराती पोस्ट करते, त्याचे १.९२ कोटी रुपये घेते. त्याचबरोबर ती ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ कंपनीची मालकीणही आहे. यातूनही तिची चांगलीच कमाई होते. या कंपनीने ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

त्याचवेळी, प्रियांकाचा पती निक जोनासबद्दल बोलायचे झाले, तर तो ३६७ कोटी रुपयांचा मालक आहे. निक जोनासने आपल्या कारकीर्दीची सुरुवात २००२ मध्ये केली होती. तो एक गायक, संगीतकार आणि अभिनेता देखील आहे. निकने त्याचा भाऊ जो आणि केविन यांच्यासमवेत ‘जोनास ब्रदर्स’ नावाचा बँड सुरू आहे. निकने डिझनी चित्रपटातही काम केले आहे. तसेच, निक आणि प्रियांका गरजू लोकांना मदत करतात. कोरोनाच्या काळातही ते लोकांना मदत करत आहेत.

या आंतरराष्ट्रीय जोडप्याने कॅलिफोर्नियामध्ये एक मोठा आलिशान बंगला देखील विकत घेतला होता, ज्याची किंमत तब्बल १४४ कोटी रुपये होती. प्रियांकाची भारतातही कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्याच वेळी, दोघांच्याही बर्‍याच महागड्या कार आहेत. जॅकलिन फर्नांडिस प्रियांका चोप्राच्या मुंबईमध्ये स्थित घरात भाडेकरू म्हणून राहते. काही महिन्यांपूर्वीच, जॅकलिनने प्रियांकाचे ‘कर्मयोग’ अपार्टमेंट तीन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे, त्यासाठी ती प्रियांकाला २ कोटी ४४ लाख ८ हजार रुपये भाडे देते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा

-‘दे दान दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस


Leave A Reply

Your email address will not be published.